टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीसाठी सोमवार, २५ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अधिकृतपणे सुरूवात झाली आहे. मात्र, राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता असतानाही भाजपकडून अद्याप कोणत्याही उमेदवाराच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
उमेदवारीबाबतचा हा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत असल्याने, सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून कार्यकर्त्यांमधील धाकधूक कमालीची वाढली आहे.
परिचारकांचे नाव आघाडीवर, पण…
या निवडणुकीसाठी पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे नाव सध्या सर्वात आघाडीवर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ राहिलेले नेते म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे ‘पक्षासोबतची एकनिष्ठता’ आणि ‘कार्यकर्त्यांची मोठी फळी’ या जमेच्या बाजू लक्षात घेता, प्रशांत परिचारक यांनाच उमेदवारी मिळणार असा ठाम विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

परंतु, भाजपकडून या जागेसाठी केवळ परिचारकच नव्हे, तर इतरही अनेक नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रत्येक इच्छुक उमेदवाराकडून मुंबईत पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग केले जात असल्याचे चित्र आहे.

पक्षश्रेष्ठींची ‘वेट अँड वॉच’ भूमिका
नेहमीप्रमाणे भाजप पक्षश्रेष्ठींनी या जागेबाबतही कमालीची गोपनीयता पाळली असून, उमेदवारी जाहीर करताना मोठा सस्पेन्स ठेवला आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली तरी नाव निश्चित न झाल्याने, सोलापूर जिल्ह्यात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

”कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि परिचारकांची पक्षासोबत असलेली निष्ठा उमेदवारीसाठी फायद्याची ठरणार की भाजप पुन्हा एखादा नवा धक्का देणार?” अशीच चर्चा सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील चौकाचौकांत रंगत आहे.

येत्या एक-दोन दिवसांत पक्षश्रेष्ठींकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता असून, “आमच्याच नेत्याचे नाव जाहीर होईल,” असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. आता या राजकीय सस्पेन्सचा पडदा कधी उठणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













