मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
भारतीय हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच देशातील जून महिन्यातील पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असणार आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढविणारी अपडेट दिली आहे.
राज्य सरकारने महाराष्ट्राच्या बहुतांश भागात किमान १० जुनपूर्वी मान्सूनचे आगमन होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे

आणि १ जूनपासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतर ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील.

आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहून आणि मान्सूनचे आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, असे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.
विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











