टीम मंगळवेढा टाईम्स ।
सांगोला येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस-कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील निशिगंधा संजय अदाटे व प्रतीक धम्मा मागाडे तसेच सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील तेजल रामचंद्र मिसाळ
या तीन विद्यार्थ्यांची टीसीएस या नामांकित सॉफ्टवेअर कंपनी मध्ये निवड झाली असून त्यांना वार्षिक ३.६ लाखाचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
टीसीएस हि अंतरराष्ट्रीय आय टी कंपनी असून ती एक भारतातील दिगज्ज कंपनी आहे. भारतासह ४६ देशांमध्ये या कंपनीचा विस्तार आहे.
या कंपनीमध्ये निवड झालेले विद्यार्थी यांना कॉलेज कडून ओटू ब्रिथिंग व क्यू स्पायडर या ट्रेनिंग संस्थेमार्फत ट्रेनिंग दिल्यामुळे, विद्यार्थ्यांना कंपनीसाठी आवश्यक असणारे कौशल्य विकसित झाल्यामुळे निवड प्रक्रिये मध्ये याचा फायदा होत असल्याचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर यांनी दिली.
या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक श्री अमित रुपनर, श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे,
फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, कॉम्प्युटर सायन्सचे विभाग प्रमुख प्रा. पराग दौंडे,सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ.अभिमान कनसे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज