टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील काही भागांमध्ये गेल्या अनेक दिवसांत पावसाच्या तुरळक सरी पाहायला मिळाल्या. आता उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनचा परताची प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून या भागातील नागरिकांना इशारा देण्यात आला आहे.
यात शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका सहन करावा लागला आहे.सातारा व सोलापूर जिल्ह्यातील तुरळक भागात ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दि.10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Return showers will fall in Pune, Kolhapur, Satara, Sangli, Solapur district of the state
त्याशिवाय 10 ऑक्टोबरला नांदेळ व लातूर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातही वादळी वारा व ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय धुळे, नंदुरबार, जळगाव व नाशिक या जिल्ह्यात अत्यंत तुरळक पावसाच्या सरी कोसळू शकतात. दुसरीकडे पालघर, मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये अत्यंत कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Return showers will fall in Pune, Kolhapur, Satara, Sangli, Solapur district of the state
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज