टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील यांच्यासह एकावर मंगळवेढा पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणाची फिर्याद ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी गणेश सोनवले यांनी दिली. तालुक्यातील महमदाबाद शे.येथील बसवेश्वर मंदिरासमोरील आवारात ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी गणेश सोनवले
हे बसले असता त्यांना बाजार समितीचे संचालक सूर्यकांत पाटील व त्यांचे सहकारी मल्लिकार्जुन जोंधळे यांनी जातीवाचक शिवीगाळ करून धमकी दिली.
मल्लिकार्जुन जोंधळे यांनी गच्ची धरली, त्यावेळेस सूर्यकांत पाटील यांनी तोंडावर मारून जातीवाचक शिव्या दिल्या, अशी फिर्याद गणेश भानुदास सोनवणे यांनी दिली आहे.
तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील या करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज