टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील भोसे व 39 गावांचा पिण्याचा पाणीपुरवठ्याची भोसे नळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे सदर योजना सुरू होण्याच्या अनुषंगाने विज बिल हा या योजनेतील प्रमुख मोठा अडथळा होता दरवर्षी वीज बिलाचा प्रश्न योजना सुरू करण्यासाठी पहिल्यांदा येत असल्याने ही योजना पैसे अभावी बंद राहत होती.

आमदार समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करून भोसे प्रादेशिक योजनेच्या जुनोनी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर सोलर प्रकल्प मंजूर करून कार्यान्वित केला असून या ठिकाणी 155 KVA प्रकल्प कार्यान्वित झाला असून सुमारे 400 युनिट वीज येथे तयार होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

यावेळी बोलताना आ.समाधान आवताडे म्हणाले की, जलशुद्धीकरण केंद्र जुनोनी येथे जलजीवन मिशन अंतर्गत वर्ष 2023-2024 मध्ये सोलर प्लांटमंजूर करून घेतला होता त्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून 155 KVA चा सोलर प्रकल्प सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर पासून कार्यान्वित करण्यात आला आहे.

सदर सोलर प्रकल्पातून दररोज साधारण 400 युनिट वीज निर्मिती होऊन महावितरण कंपनीला देण्यात येत आहे.
सध्या जलशुद्धीकरण केंद्र जुनोनी येथे 60 HP चे दोन व 10 HP चे दोन पंप तसेच इतर कामासाठी वीज वापर होत आहे. सद्यस्थितीत जलशुद्धीकरण केंद्रावर जवळपास 400 युनिट वीज महावितरण कडून घेऊन वापरली जात होती,सदर सोलर प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे तयार होणारी वीज व वापरली जाणारी वीज जवळपास सारखीच राहणार आहे.

त्यामुळे यापुढील काळात जलशुद्धीकरण केंद्र येथील वीज बिल शून्य येणार आहे सदरच्या योजनेसाठी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते ते काम पूर्ण झाले असून याच भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर भीमा नदीतून पाणीपुरवठा केला जातो त्या ठिकाणीही सोलर प्लांट मंजूर करण्यात आला असून त्याचेही काम लवकरच करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

तिथेही सोलर प्लांट चे काम पूर्ण झाल्यानंतर वीज बिलातून भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मुक्त होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














