टीम मंगळवेढा टाईम्स ।
दामाजी एक्सप्रेस समुहातील दै . स्वाभिमानी शहरच्यावतीने मंगळवेढा मंगळवेढा शहर व तालुक्यात कार्यरत असणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींना शिक्षक दिनानिमित्त याही वर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून
सदर पुरस्कारांचे वितरण आज सोमवार दि.५ सप्टेंबर रोजी मंगळवेढा नगरपरिषद सभागृहात होत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे हे भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे, माजी सभापती अॅड नंदकुमार पवार,
सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर, गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड . सुजीत कदम, पोलिस निरिक्षक रणजित माने, श्री संत दामाजी महाविदयालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एन.बी.पवार , म.सा.दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे , न.पा. शिक्षण मंडळ प्रशासनाधिकारी शाहू सतपाल , गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे,
शिक्षण विस्तार अधिकारी बजरंग पांढरे , डॉ बिभीषण रणदिवे , शिक्षक नेते संजय चेळेकर , सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये डॉ. अशोक माने , डॉ . औदुंबर जाधव , प्रा . चिंतामणी जगताप , जयराम आलदर, विकास मोरे , विशाल माने , शिवाजी कोंडुभैरी सुजाता काटे, वैशाली लेंडवे, जयश्री स्वामी , कैलास नवगिरे आदींना सन्मानित करण्यात येणार आहे.
शिक्षणप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन दामाजी एक्सप्रेस , स्वाभिमानी छावा , स्वाभिमानी शहर , दामाजी न्यूज परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज