मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
सोलापूर जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. दुष्काळ निवारण, पाणीटंचाई, पीक कर्ज पुनर्गठन आणि शेतकऱ्यांना मदत देण्याच्या कामांना गती देण्यासाठी

महसूल, कृषी, ग्रामविकास आणि जलसंपदा विभागाच्या जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी विनापरवाना मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करून अनधिकृतपणे रजेवर जाणाऱ्या किंवा मुख्यालय सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा सक्त इशारा त्यांनी दिला आहे.

आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कडक कारवाईचा बडगा
जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदींनुसार हे आदेश जारी केले आहेत. सध्या जिल्ह्यात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे गरजेचे आहे.

यासाठी सर्व प्रमुख अधिकाऱ्यांनी मुख्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहून पीक पाहणी, पाणीटंचाई निवारण आणि शेतकरी मदतीची सर्व कामे सर्वोच्च प्राधान्याने पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

परस्पर घेतलेली रजा ठरणार बेकायदेशीर
प्रशासकीय कामकाजात कोणतीही दिरंगाई किंवा गैरहजेरी खपवून घेतली जाणार नाही, यासाठी रजा मंजुरीचे नियमही अधिक कठोर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांची कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करण्याचे सर्वाधिकार आता केवळ जिल्हाधिकाऱ्यांकडेच राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मूळ प्रशासकीय प्रमुखांकडून किंवा परस्पर मंजूर करून घेतलेली कोणतीही रजा ग्राह्य धरली जाणार नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाचे मुद्दे :
महसूल, कृषी, ग्रामविकास आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास बंदी.
विनापरवाना रजेवर गेल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल होणार.
पीक पाहणी आणि दुष्काळ निवारणाच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश.
रजा मंजुरीचे सर्वाधिकार केवळ जिल्हाधिकाऱ्यांकडेच राखीव.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










