mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 1, 2026
in क्राईम, मंगळवेढा, राजकारण
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स  (प्रतिनिधी) :

प्लॉटचा वाद मिटविण्यासाठी नगरपरिषदेत एका ४० वर्षीय आशा सुपरवायझरला बोलावून तिच्या अंगात मस्ती आली असून तिची साडी काढा, तिला नागवे करा असे मनाला लज्जा वाटेल शब्द वापरुन चप्पल, लाथाबुक्क्या, खुर्ची व काठीने मारहाण केल्याप्रकरणी

नगरसेवक प्रविण खवतोडे, अंबू तांबे, जयश्री भंडारेची आई, जयश्री अवघडे, मैना मस्के, चित्रा खरबडे, सिध्दू शिकतोडे, दिपक अवघडे, सागर खरबडे, इंद्रजीत तोंडसे, विशाल लोकरे (सर्व रा. मंगळवेढा) या १२ जणाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती

अशी, यातील फिर्यादी अनिता राजू काळुंगे (वय ४० वर्षे, रा. कचरेवाडी) या आशा सुपरवायझर असून चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्दीत रजपूत कॉलनी येथे फिर्यादीचा दोन गुंठ्याचा प्लॉट आहे. या प्लॉटमध्ये जयश्री भंडारे व निलेश जगधने यांनी अतिक्रमण करुन जागेवर पत्राशेड मारले आहे.

याबाबत धारासिंग रजपूत व जयश्री भंडारे यांना फिर्यादीने पत्राशेड काढणेबाबत सुचना दिली असता जयश्री भंडारे हिने मला पत्राशेड मारण्यासाठी ३ लाख रुपये खर्च झालेला आहे. तू मला ३ लाख रुपये दे त्यावेळी मी पत्राशेड काढून घेईन असे फिर्यादीस म्हटले होते.

दि. २७ रोजी सकाळी ११ वाजता फिर्यादी कचरेवाडी येथे घरी असताना आरोपी नगरसेवक प्रविण खवतोडे याने फिर्यादीस तुम्ही नगरपरिषदेस या रजपूत कॉलनी येथील प्लॉटचा वाद मिटवायचा आहे असे सांगीतल्यावर फिर्यादी ही दुपारी १ वाजता एकटीच नगरपरिषदेमध्ये आली.

त्यावेळी आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत तेथे सोबत असलेल्या बायकांना फिर्यादी हिला ठोका, तिच्या अंगात मस्ती आहे, तिची साडी काढा, तिला नागवे करा असे मनाला लज्जा वाटेल असे बोलल्याने उपस्थित सर्व महिलांनी फिर्यादीस चप्पल, काठीने, खुर्चीने, हाताने मारहाण केली.

तसेच सोबतच्या बायकांनी फिर्यादीच्या गळ्यातील एक तोळ्याचे मिनी गंठण तोडून घेतले असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी ही जखमी झाल्याने उपचाराकरिता मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात जावून प्राथमिक उपचार करुन सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात वर्ग करण्यात आले होते. तद्नंतर मंगळवेढा पोलीस ठाण्यात येवून वरील आरोपी विरुध्द बीएनएस ७९,११८ (१), ११९(१),११५ (२), ३५२,३५१(२), (३), १८९(२),१९१ (२), (३), १९० कलमा प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून याचा अधिक तपास पोलीस हवालदार कांबळे हे करीत आहेत.

जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल

मंगळवेढा येथील एका ४० वर्षीय दलित महिलेस चप्पलने मारहाण करून, केस पकडून, खाली पाडून पोटात लाथा घातल्या तसेच गळ्यातील ०१ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र हे तोडून जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अनिता राजू काळुगे (रा. कचरेवाडी, ता. मंगळवेढा) व धारासिंह मोहनसिंह रजपूत (रा. मंगळवेढा) या दोघांविरूद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागील ०३ महिन्यापुर्वी पासून ते दिनांक २७/०९/२०२६ रोजी दुपारी ०१/०० वा. चे दरम्यान फिर्यादी महार जातीची आहे हे माहीत असताना आणि याची पुरेपुर जाणीव असताना धारासिंह मोहनसिंह रजपूत याने रजपूत कॉलनी मंगळवेढा येथे येऊन फिर्यादीस मी तुला कमी किमतीत प्लॉट विकलेला आहे.

मला अजून पैसे द्यावे लागतील, तुझ्याकडे पैसे नसतील तर तुला माझ्यासोबत झोपावे लागेल असे म्हणून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच फिर्यादीच्या प्लॉट शेजारील महीला अनिता राजु काळुंगे (रा. कचरेवाडी ता. मंगळवेढा हिने घरासमोर येऊन मला, तुम्ही तुमचे घरात जायचे नाही, तुमचे घर माझे जागेत आहे, असे म्हणून फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडून

घरातील संसारपयोगी साहित्य बाहेर काढून घरास दुसरे कुलूप लावून तुम्ही मी जाळी मारलेल्या जागेत यायचे नाही, तुम्ही येथे कशाला हात लावायचा नाही. तुम्ही माझे जागेत रहायचे नाही, तुम्हा लोकांचा मला लय तिटकारा आहे, तुमचे मला तोंड बघायचे नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळी केली तसेच नगरपरिषद मंगळवेढा येथे येऊन कोण चंक्या आहे, तो काय करतोय ते बघायचं आहे. तुमचा चंक्या काय करतोय ते मी बघते, असे म्हणून शिवीगाळी केली आणि चप्पलने मारहाण करून केस पकडून खाली पाडून पोटात लाथा घातल्या. तसेच

फिर्यादीच्या गळ्यातील ०१ ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र तोडून घेतले व जिवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद दिल्याने पोलिसांनी अनिता राजू काळुंगे व धारासिंह मोहनसिंह रजपूत यांच्याविरूध्द बीएनएस कलम-७४,७५ (२), ११९ (१), ११८(१),३३२ (क), ११५ (२), ३५२,३५१ (२) (३), ३(५ सह अ.जा.अ.ज.अ.प्र.का. कलम ३(१) (r), ३(१) (s), ३(१) (w) (i), ३(१) (w) (ii), ३(२) (va), ३(२) (पाच) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे हे करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आरोपी नगरसेवक प्रवीण खवतोडे

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

September 30, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 29, 2026
अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

अनाथ, वंचितांच्या आयुष्याला मायेची सावली: निंबोणीचे ‘सहारा बाल सेवा आश्रम’ ठरतेय निराधार चिमुकल्यांचे हक्काचे घर; ​शासकीय अनुदानाविना केवळ लोकवर्गणीतून उभा राहतोय मानवतेचा वसा

September 24, 2026

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

September 30, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

September 30, 2026
स्व.जनाबाई आवताडे यांचे आज व्दितीय पुण्यस्मरण; भजन, पुष्पवृष्टीचे आयोजन

स्व.जनाबाई आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवेढ्यात कीर्तन सोहळा; हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांची उपस्थिती

September 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा