टीम मंगळवेढा टाईम्स :
मंगळवेढा तालुक्यात ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी समस्त मंगळवेढेकर नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रशासनाने यावर तातडीने कारवाई न केल्यास येत्या ३ ऑक्टोबर पासून संपूर्ण मंगळवेढा तालुका बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे मंगळवेढा यांना समस्त मंगळवेढेकरांच्या वतीने एक लेखी निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या दाखल झालेल्या कथित ॲट्रॉसिटी गुन्ह्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी.
तपासाअंती जर हा गुन्हा खोटा असल्याचे निष्पन्न झाले, तर तो कायदेशीर प्रक्रियेनुसार तत्काळ रद्द करण्यात यावा, तसेच कायद्याचा जाणीवपूर्वक गैरवापर करणाऱ्यांवरही कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.

शांततामय मार्गाने आंदोलनाचा निर्धार
प्रशासनाने नागरिकांच्या या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य ती पावले उचलावीत, अन्यथा ३ ऑक्टोबर २०२६ पासून संपूर्ण तालुक्यात बेमुदत बंद पुकारला जाईल. हे आंदोलन पूर्णपणे शांततामय आणि कायदेशीर मार्गाने केले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

दरम्यान, समस्त मंगळवेढेकरांच्या वतीने शिवतीर्थावर सायंकाळी 7 वाजता सर्व समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व समाजातील व्यक्तीवर झालेला अन्याय त्यांनी कथित केला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












