मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
कॉक्रोच जनता पार्टीच्या जेन-झीकडून शाळांना भेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे. त्याचा धसका आता शिक्षण विभागाने घेतल्याचे समोर येत आहे. शाळेत येणाऱ्या सर्व अभ्यागतांची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी संपूर्ण तपशील प्रवेशद्वारावरील नोंदवहीत ठेवणे बंधनकारक राहणार आहे.

अभ्यागतांच्या प्रवेशाची व बाहेर पडण्याची वेळ तसेच भेटीचा उद्देश स्पष्ट नोंदवावा लागेल, असा आदेश सोलापूरचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल मुळे यांनी सर्व मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यांना काढला आहे.
कॉक्रोच पार्टीचे अभिजीत दीपके व त्यांच्या सहकाऱ्यांकडून शाळांची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. त्यात अनेक गंभीर बाबी समोर येत आहेत. त्यानंतर आता शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा आदेश काढलेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि

सर्व माध्यमांच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय तसेच केंद्र शासन व न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करणे सर्व शाळांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

मुख्याध्यापकांनी शाळेतील नोंदवही दररोज तपासणे गरजेचे आहे. तसेच पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी शाळा भेटीदरम्यान या नोंदवहीची तपासणी करून त्यावर प्रतिस्वाक्षरी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

शाळांमधील विद्यार्थी सुरक्षेच्या उपाययोजनांचा नियमित आढावा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे विनाविलंब सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही प्रकारची हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
परवानगीशिवाय फोटो, व्हिडीओ काढल्यास कारवाई
पालक व सक्षम प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय विद्यार्थ्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढणे, वापरणे अथवा त्यासाठी मदत करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू असेल. विद्यार्थी सुरक्षेशी संबंधित नियमांचे कोणतेही उल्लंघन झाल्यास त्याची माहिती तत्काळ वरिष्ठ कार्यालय व प्रशासनाच्या निदर्शनास आणावी लागेल, असेही आदेशात म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












