mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अनिल सावंत यांना कशी उमेदवारी मिळाली? धैर्यशील मोहिते पाटलांनी सांगितली Inside Story; ‘या’ उमेदवारावर केली सडकून टीका

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 6, 2024
in मंगळवेढा, राजकारण
पवार साहेबांशी गद्दारी करणाऱ्या भालके यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांची जहरी ठिका

टीम मंगळवेढा टाईम्स।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच्या हक्काचा मतदारसंघ आहे. अनेक उमेदवार तुतारी कडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यामुळे उमेदवारीवरून बरेच दिवस पेच होत राहिला.

पण इतर उमेदवारांसारखे चल बिचल व इकडे तिकडे न करता अनिल सावंत हे शेवटपर्यंत पक्षाबरोबर प्रामाणिक राहिले म्हणूनच त्यांना खासदार शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे. आणि अनिल सावंत हेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत असे प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल सावंत यांचा प्रचाराचा शुभारंभ माचनूर येथे सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून करण्यात आला

यावेळी खासदार मोहिते पाटील बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राहुल शहा, प्रथमेश पाटील, रविकांत पाटील, दत्तात्रय भोसले, रवींद्र पाटील, पंढरपूर शिवसेनेचे शहराध्यक्ष हरिभाऊ मुळे, राष्ट्रवादीचे सुभाष भोसले, अण्णा सिरसट, काँग्रेसचे फिरोज मुलाणी, संतोष रंधवे यांच्यासह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

खासदार मोहिते पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती कोणी केली आहे याचा गौप्यस्फोट मी येत्या काही दिवसात करणार आहे. भालके यांनी उमेदवारी संदर्भात प्रतीक्षा न करता पवार साहेबांचा विश्वासघात करून काँग्रेसची उमेदवारी मिळवली आहे.

देशात हुकूमशाही सरकार आले असून महिलांसाठी दिलेले पैसे सरकार दुसऱ्या बाजूने काढून देखील घेत आहे. सगळ्या बाजूने हे सरकार आपली पिळवणूक करत असल्याचे दिसत आहे. राज्यात देशात एवढी महागाई वाढवली आहे. की सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.

नुसती घोषणा बाजी करून प्रत्येक समाजाची फसवणूक केली आहे. जाती धर्मात जातीय तेढ निर्माण करून भांडणे लावली जात आहेत. आशा सरकारला पायउतार करून जागा दाखवून देण्याची गरज आहे. सोलापूर जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री अजून दिला नाही.

प्रत्येक कार्यालयात टक्केवारी दिल्याशिवाय कामे होत नाहीत. ही कसली हुकूमशाही निर्माण केली आहे. प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार सुरू आहे हे सर्व रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार आणावे असे आवाहन देखील त्यांनी केले. सोलापूर जिल्हा हा सहकारावर उभारला आहे. शेतकरी व सभासदांच्या मालकीच्या संस्था निर्माण केल्या.

विठ्ठल कारखाना अडचणीत येईल तेव्हा शरद पवार साहेबांनी मदत केली म्हणून शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला. मंगळवेढा-पंढरपूर ही जागा राष्ट्रवादीची असताना भालके यांनी गद्दारी केली. त्यांना जनता त्यांची जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.

अनिल सावंत एकनिष्ठ राहिले जेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या अग्रहा खातर अनिल सावंत यांना उमेदवारी मिळाली. 2009 ची चूक जनता आता सुधारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवार अनिल सावंत बोलताना म्हणाले की, महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारी मला आपली सेवा करण्यासाठी मिळाली आहे. पक्षाने व शरद पवार साहेबांनी व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. मी कायम जनतेत मिसळून काम करणार आहे. मी कुणावरही टीका करणार नाही, मी विकास करून दाखवणारा आहे,

मी माझ्या कामातून विजयी मिळवून  विजयाचा गुलाल घेऊनच मुंबईला व बारामतीला जाईल. महिलांसाठी सर्व योजना व उद्योग व्यवसाय निर्माण करण्यासाठी येणाऱ्या काळात मोठा प्रकल्प सुरू करणार असल्याचे जाहीर केले. मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील सर्व गावातील अडीअडचणी जाणून त्या अडचणी सोडवून विकास करण्यासाठी मला संधी द्या असे आवाहन सावंत यांनी केले.

लक्ष्मण ढोबळे बोलताना म्हणाले की, तीन हजार रुपये कोटीचा निधी मतदार संघात आला आहे तर कामे कुठे कुठे झाली आहेत याची माहिती द्यावी, डिजिटल बोर्ड लावावे. आता आजी आमदार यांना माजी करून घरी बसवावे असे आवाहन माजी मंत्री ढोबळे यांनी केले. सर्वसामान्य जनतेला आमदाराची भेट होत नाही असा हल्लाबोल देखील केला.

राहुल शहा बोलताना म्हणाले की, सर्वांना विश्वासात घेऊन अनिल दादा सावंत यांना उमेदवारी दिली. पूर्वीपासून हा मतदारसंघ शरद पवार यांना मानणार आहे. या दोन्ही तालुक्यात मोठ्या मताधिक्याने आपला विजय निश्चित आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल सावंत

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

विद्यार्थी व प्रवाशांना मोठा दिलासा! मंगळवेढा आगारासाठी ५ नव्या एसटी बसेस दाखल; अनिल सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मागणी मान्य

August 22, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

गावाचे अस्तित्व वाचवण्यासाठी लढा, पण पोलिसांचा 35 ग्रामस्थांवर गुन्हे; मंगळवेढ्यात बायपास आंदोलनावरून ग्रामस्थ आक्रमक; हक्क मागणे हा गुन्हा आहे का?

August 21, 2026
जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

जिल्हा बँकेवर मंगळवेढ्यातून ‘नवी उमेद’! लिंगाणा पाटील पतसंस्था मतदारसंघातून रिंगणात उतरणार; तालुक्यातील दिग्गजांची साथ; मंगळवेढ्यात राजकीय घडामोडींना वेग

August 20, 2026
Next Post

एका शिक्षकाने केली दुसऱ्या शिक्षकाविरुद्ध ॲट्रॉसिटी; पोलिसात तीन महिन्यांनंतर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा