टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथे माेकळ्या मैदानात न्यायालयाची व महाराष्ट्र शासनाची प्राण्याच्या शर्यतीला बंदी असताना त्या नियमाचा भंग करून बैलगाडी शर्यंत घेन्याच्या तयारीत असताना पाेलीसांनी सदर ठिकाणी छापा टाकुन
रवींद्र चव्हाण (वय 36 रा.खलाटी जत), सुरेश दगडू पोकळे (रा.घेरडी), ओम जगन्नाथ एकचे (रा.लंगरपेठ), रवींद्र सखाराम कोळेकर (वय. 23 रा.आरेवाडी) महादेव थोरबोले (रा.रड्डे ) या पाच जणाविरुद्ध प्राण्यांचा छळ करणे या प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि.10 रोजी सकाळी ८.४५ वाजता रड्डे शिवारात नंदेश्वर ते रड्डे जाणाऱ्या राेडलगत आसलेल्या माेकळ्या मैदानात
वरील पाच आरोपीने एकत्र येऊन त्यांच्या ताब्यातील पाळीव प्राणी बैल हे घोडा गाडीला शर्यतीसाठी
झूंपुन शर्यत घेन्याच्या तयारीत आसल्याची
गाेपनिय माहीती डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक रणजितसिंह माने यांनी पाेलीससह छापा टाकुन पाचजनाविरूध्द गुन्हा दाखल केला.
याची फिर्याद पोलीस नाईक रवींद्र पवार यांनी दिल्यावर वरील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालय व शासनाची पाळीव प्राणी शरीरातील बंदी आहे असे असतानाही वरील आरोपीने नियमाचा भंग करून शर्यत लावण्याचा प्रयत्न केला होता. याचा अधिक तपास पोलीस हवालदार सुनील गायकवाड हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज