टीम मंगळवेढा टाईम्स ।
कवठे गावच्या सरपंच भाभी अचानक बेपत्ता झाल्याने संपूर्ण गावच सुन्न झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठे गावच्या प्रथम ग्रामस्थ सरपंचच गायब झाल्याने पाहुणे मंडळीही कवठे गावात मुक्कामी आहेत.
गावातील उस्मान शेख कुटुंबाचा शेतीवर भार शेतीवरच कुटुंबाची गुजराण शेतीच्या निमित्ताने गावातील सर्वांशी व्यवहार चालतो.
त्यामुळे शेख कुटुंबाचे गावातील सर्वांशी चांगले संबंध, उस्मान यांच्या पत्नी जैतुनबी यांना गावातील लोक भाभी म्हणून ओळखतात.
राजकारणापासुन अलिप्त असलेल्या कुटुंबातील भाभी या निवडून आल्या व सरपंचही झाल्या. बुधवारी अचानक भाभी घरातून निघून गेल्या.
मुले सरदार व रियाज यांनी सगळीकडे शोधाशोध केली; पण आई सापडली नाही.
सलगर वस्ती पोलीस स्टेशनला मुलगा सरदारने आई जैतुनबी उस्मान शेख ( वय ६३ ) बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे. चार दिवसांत भाभीचा शोध काही लागला नाही.(स्रोत:लोकमत)
एक चप्पल .. संपूर्ण विहीर उपसली
गावालगत व शेताजवळच्या सर्व विहिरी , पाहुणे , इतर गावे व सभोवताल गावकऱ्यांनी पिंजून काढला आहे. सोशल मीडियावर फोटो टाकून शक्य तेवढ्या ठिकाणी पाठविले आहे.
शेताच्या रस्त्याच्या बाजूच्या पाऊलवाटेला एक चप्पल आढळल्याने जवळच्या विहिरीचे संपूर्ण पाणी उपसले आहे; पण भाभीचा शोध लागला नसल्याचे मुलगा सरदारने सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज