टीम मंगळवेढा टाईम्स : समाधान फुगारे
गोव्याची सहल करून परतणाऱ्या बुलढाण्याच्या एका ४० वर्षीय तरुणाला मंगळवेढ्याजवळ अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला.

अत्यंत गंभीर आणि क्रिटिकल परिस्थितीत, कोणतीही वेळ न दवडता मंगळवेढ्यातील बेलदार हॉस्पिटलचे डॉ.सचिन बेलदार यांनी तात्काळ उपचार सुरू करत या तरुणाचे प्राण वाचवले आहेत.

नातेवाईक सोबत नसतानाही केवळ मित्रांच्या विश्वासावर डॉक्टरांनी स्वतःच्या जोखमेवर घेतलेले निर्णय आणि दाखवलेली तत्परता यामुळे आज एका कुटुंबाचा आधार वाचला असून, बेलदार हॉस्पिटलचे व डॉ.सचिन बेलदार यांचे संवेदनशीलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नेमकी घटना काय?
बुलढाणा येथील रहिवासी असलेला एक ४० वर्षीय तरुण आपल्या मित्रांसोबत गोव्याला फिरायला गेला होता.

गोव्याहून परतत असताना मंगळवेढ्याजवळ अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. मित्रांनी त्याला तात्काळ मंगळवेढ्यातील प्रसिद्ध ‘बेलदार हॉस्पिटल’मध्ये दाखल केले.

परिस्थिती अत्यंत गंभीर, रक्तदाब २०० च्या पार
हॉस्पिटलमध्ये दाखल करताच डॉक्टरांनी तात्काळ त्याची तपासणी केली. हृदयाचा कार्डिओग्राम (ECG) केला असता, त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack – Acute Anterior wall myocardial Infarction) आल्याचे निदान झाले.

रक्तदाब (BP): २००/१२० मिमी Hg इतका वाढला होता. ऑक्सिजन पातळी: खालावून अवघी ७०% वर आली होती. डॉक्टरांनी स्वतःच्या जोखमेवर सुरू केले उपचार रुग्णाची स्थिती अत्यंत नाजूक असल्याने त्याला तात्काळ व्हेंटिलेटरवर घेण्यात आले.
यावेळी रुग्णासोबत त्याचे केवळ मित्र होते, कुटुंबातील किंवा रक्ताचे नातेवाईक कोणीही जवळ नव्हते. अशा अत्यंत बिकट आणि कायदेशीरदृष्ट्या संवेदनशील परिस्थितीत, डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी फोनवरून संपर्क साधला.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, नातेवाईक येण्याची वाट न पाहता स्वतःच्या जोखमेवर तात्काळ उपचार आणि रक्ता गुठळ्या विरघळवणारी (रक्त पातळ करण्याची) इंजेक्शन देण्यास सुरुवात केली.
दोन दिवसांत चमत्कार; रुग्ण सुखरूप घरी रवाना
बेलदार हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टीम आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले. उपचार सुरू झाल्यानंतर रुग्णाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली. अवघ्या दोन दिवसांत रुग्णाची प्रकृती पूर्णपणे स्थिर झाली. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी आणि विश्रांतीसाठी सुखरूपपणे त्याच्या गावी (बुलढाणा) रवाना करण्यात आले.
”रुग्ण हाच आमचा ध्यास” हे ब्रीदवाक्य बेलदार हॉस्पिटलने केवळ शब्दांत न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. नातेवाईक पाठीशी नसताना एका अनोळखी शहरात डॉक्टरांनी दाखवलेली ही माणुसकी सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुकाचा विषय ठरत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











