mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारतनानांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी विठ्ठल परिवाराने प्रयत्न केले पाहिजेत : खा.शरद पवार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 18, 2020
in सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

विठ्ठल परिवाराने ज्याप्रमाणे कै. औदुंबरआण्णा पाटील, आ.भारत भालके यांना एकत्रित राहून साथ दिली तशीच ऐकी आताही दाखवून काम करावे. कारखान्यासह या भागाच्या विकासासाठी तुमची ऐकी आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.

दरम्यान त्यांनी वडीलधाऱ्याच्या नात्याने माझे पंढरपूर भागावर पूर्ण लक्ष असल्याचे स्पष्ट केले. ते सरकोली येथे कै.आमदार भारत भालके यांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले असता बोलत होते.

आज शुक्रवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता खासदार शरद पवार हे पंढरपूरला आले व तेथून ते सरकोलीत पोहोचले होते. त्यांच्यासमवेत पालकमंत्री दत्तात्रय भरणे , राष्ट्रवादीचे दीपक साळुखे,सहकार शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे व विठ्ठलचे संचालक उपस्थित होते.

सरकोली येथे पवार यांनी कै.भारत भालें यांचे चिरंजीव भगीरथ भालके व कुटुंबाची भेट घेतली.

कै.भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराचा नेता कोण असणार? कारखान्याची सूत्र कोणाकडे जाणार, याबाबत उत्सुकता होती. याबाबत पवार काय बोलणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते.

पवार यांनी उपस्थित लोकांना संबोधित स्पष्ट केले की, कै.भारतनानांनी पंढरपूर व मंगळवेढ्याचा विकास, मंगळवेढ्याच्या दुष्काळी भागातील पाणी योजना , विठ्ठल कारखाना यासाठी सतत काम केले आहे. त्यांच्या अकाली जाण्याने दुःख झाले आहे.

मात्र या दुःखातून सावरून विठ्ठल परिवाराने एकत्र राहून त्यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मध्यंतरीच्या काळात राज्यातील साखर कारखानदारी ही दुष्काळात कमी ऊसपुरवठा तसेच यानंतर साखरेचे दर कोसळल्याने अडचणीत आली आहे.

याचा फटका पंढरपूर भागातील साखर कारखान्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. कारण येथे उसाचे सर्वाधिक उत्पादन होते.

साखर कारखाने चांगले पाहिजेत व यातून शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारले पाहिजे. निवडणुका येतात जातात मात्र संस्था टिकल्या पाहिजेत.

या तालुक्याने कै.औदुंबरआण्णा पाटील यांना साथ दिली व त्यांनी ही येथे संस्था उभारल्या. पुढील काळात त्यांच्याच समवेत काम केलेल्या भारतनानांनी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्षपद स्वीकारले. आता कै.भारत भालके यांचे अचानक निधन झाले आहे.

या दुःखातून सावरून तुम्ही सर्वांनी एकत्र येवून काम करा , मी तुमच्या सोबत आहे. असा विश्वास शरद पवार यांनी दिला.

यावेळी पवार यांनी आपल्या भाषणात सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचा सतत उल्लेख केला. पवार यांनी सरकोलीत आल्यानंतर कारखाना संचालक तसेच विठ्ठल परिवारातील नेते यांची भेट घेतली होती.

भाषणात बोलताना ते म्हणाले, येत्या काही दिवसात मी पुन्हा पंढरपूरला येणार आहे. त्यावेळी बसून आपण पुढे काय करायचे ते ठरवू यात मात्र विठ्ठल परिवाराने आता एकत्र राहणे गरजेचे आहे.

मी 80 वर्षाचा असून वडीलधारा आहे. या नात्याने माझे लक्ष या भागावर अधिक असणार आहे. कै.भारत भालके यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, भारतनाना ही अनेक पक्षांकडून निवडणुका लढविल्या व ते विजयी ही झाले.

मात्र त्यांनी माझ्या प्रती प्रेम कधीच कमी होवू दिले नाही. निवडणुकीत विजय मिळविला की ते बारामतीमध्ये येत. मला हार देऊन म्हणत , मी आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यादरम्यान सरकोलीत मोठ्या प्रमाणात भालके समर्थकांनी गर्दी केली होती.कल्याणराव काळे यांच्यासह अनेकजणांनी येथे आपली मनोगत व्यक्त केली .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार भारत भालकेशरद पवारसराकोली भेट

संबंधित बातम्या

तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

दुष्काळाची चिंता मिटली! ‘या’ तारखे दरम्यान धो-धो पावसाची शक्यता; हवामान अभ्यासकांचा ‘हा’ अंदाज उडवेल झोप

September 12, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 17, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; आज जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 14, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
Next Post
भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यानी घेतली शरद पवारांची भेट, सुप्रिया सुळेंनी फोटो केला शेअर

शरद पवार यांचे उमेदवारीवरून सूचक वक्तव्य, उमेदवार कोण असणार सस्पेन्स कायम

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 19, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 19, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा