टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात कमी झालेला कोरोनाने पुन्हा थैमान घातले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक रूग्ण आढळत आहेत, त्याठिकाणचा अभ्यास करण्याठी केंद्रीय पथके राज्यात आली आहेत.
मात्र सोलापुरात अभ्यास करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकालाच कोरोनाने घेरले असून पथकातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची भीषण परिस्थिती उघड होत आहे.
या पथकातील एकाला कोरोनाची लागण झाली असून दुसरे सदस्य हे विलगीकरणात गेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला आहे.गुरुवारी शहरात ९ जणांचा, तर ग्रामीण भागात ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून नव्या ७९४ रुग्णांची भर पडली आहे.
आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४९ हजार ३८ तर शहरातील १८ हजार १६, असे एकूण ६७ हजार ५४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील १२६६ तर शहरातील ७७६ अशा एकूण २०४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णवाढीची कारणे? कोणत्या परिसरातच रुग्ण वाढत आहेत? मृत्यूचे प्रमाण का वाढत आहे? त्याचा वयोगट कोणता? या सर्व बाबींचा अभ्यास व पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक सोलापुरात दाखल झाले असून ते पुढील पाच दिवस तळ ठोकून असणार आहे.
मात्र यादरम्यानच पथकातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. या पथकातील एकाला कोरोनाची लागण झाली असून दुसरे सदस्य हे विलगीकरणात गेले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.(पुढारी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज