mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ठाकरे सरकारमुळेच महाराष्ट्राची बदनामी, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे : ना.रामदास आठवले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 10, 2021
in राज्य

समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत ना.आठवलेंची मागणी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यात सध्या अनेक विचित्र घडामोडी घडत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राची परिस्थिती बिघडत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय ना.रामदास आठवले यांनी केली आहे.

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यातील आयोजित सभेत ते बोलत होते.

व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख झअनुसूचित जाती जमातीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष माजी आ.सुधाकर भालेराव,अण्णाभाऊ साठे महामंडळ माजी अध्यक्ष व भाजप प्रदेश सचिव अमितजी गोरखे, संघटक सचिव दीपक चंदनशिवे, प्रदेश महामंत्री सचिन आरडे, प्रदेश सचिव संजीव खिलारे, पंढरपूरचे माजी सभापती श्रीमंत मस्के, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, दामाजी कारखान्याचे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी,भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरुकुल, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे,संचालक सचिन शिवशरण,शहराध्यक्ष गोपाळ भगरे आदीजन उपस्थित होते.

ना.आठवले पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातील सर्वांचा पाठिंबा मिळवून समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवायचे आहे.त्यासाठी आपण जीवाचे रान करून प्रचार केला पाहिजे.

समाधान आवताडे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत अनेक गरिब गरजू नागरिकांना मदत केली आहे.त्याच्या या कामाची दखल घेऊन त्यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. हे या मतदारसंघासाठी मोठ्या फायद्याची गोष्ट आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आम्ही आजपर्यंत अनेक आंदोलने केली आहेत. पण हे सरकार गरीबांना आरक्षण देत नाही ही मोठी शोकांतिका आहे.अशा या सरकारला जनतेने घरी बसवले पाहिजे.

सचिन वाझेचे बोलावता धनी हे सरकार मधील बडे मंत्री आहेत, त्यातील अनिल देशमुख यांनी 100 कोटींची वसुली प्रकरणी राजीनामा दिला आहे.या वसुली सरकारमुळे महाराष्ट्राचे नाव जगात बदनाम होत असल्याचे त्यांनी सांगितले.

याद राखा महाराष्ट्राला बदनाम कराल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली असून शेवटी निवडणुकीची तारिख आहे सतरा आणि राष्ट्रवादीला आहे खतरा ही कविता करून त्यांनी भाषणाचा शेवट केला.

समाधान आवताडे बोलताना म्हणाले, महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरी विरोधात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात ही निवडणूक आहे.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे आज त्या विषयावर काहीच बोलत नाहीत, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

मंगळवेढा-पंढरपूर तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आजपर्यंत या प्रश्नावर नुसती आश्वासने या जनतेने ऐकली आहेत.आता सुधारणा होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्यामाध्यमातून अनेक गोरगरीब शेतकरी सामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. अनेक योजना राबविल्या आहेत.

कोरोनाच्या काळात महिला वर्गाला,शेतकऱ्यांना व बेरोजगार तरुणांना काम मिळवून देण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढारामदास आठवले

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे! अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका; आयएमडीकडून हाय अलर्ट

May 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

ऑल द बेस्ट! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर; निकाल कुठे पाहायचा?

May 1, 2026
सोलापूर ग्रामीण भागात पुन्हा 266 जण कोरोना पॉझिटिव्ह; 22 वर्षीय तरुणाचा बळी

मोठी बातमी! कलिंगड खाऊन चौघांच्या मृत्यू प्रकरणात गूढ अधिक वाढलं; डॉक्टरांनी सांगितली हादरवणारी माहिती

April 30, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी निकालाची प्रतीक्षा संपली; यंदा गुणपत्रिकेवर असणार फोटो आणि QR कोड; ‘या’ तारखेला निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता

April 30, 2026
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

धक्कादायक! 16 वर्षांच्या मुलगा मोबाईलमध्ये गुंग झाला अन् तोल जाऊन चौथ्या मजल्यावरुन पडला, पण…

April 28, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! ‘हा’ निघाला खरातच्या पुढचा बाबा, 200 व्हिडीओ, 90 गोळ्या; पोलीसही हादरले

April 25, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला तिकीट? भाजपने ‘या’ नावांची यादी दिल्लीला पाठवली; कुणाकुणाची नावे?

April 24, 2026
शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

कामाची बातमी! देवस्थान इनाम जमिनींबाबत महत्वाची अपडेट; राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

April 23, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

हेलपाटे वाचणार! जमिन NA करण्यासाठी आता सोपी, जलद ऑनलाइन प्रणाली सुरु; बीपीएमएस प्रणालीचे महसुलीमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

April 22, 2026
Next Post

कौतुकास्पद! शेतकरी, व्यापाऱ्यांसाठी महिला उमेदवाराचे लॉकडाउनच्या विरोधात पंढरपुरात आंदोलन

ताज्या बातम्या

शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

शेतकरी हाच कारखान्याचा कणा; आगामी हंगामासाठी शिवानंद पाटील सज्ज, ‘या’ गावात मांडली प्रगतीची दिशा

May 1, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 1, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

खळबळजनक! मंगळवेढा बसस्थानकावरून २५ वर्षीय विवाहित तरुणी बेपत्ता; आई, तुम्ही गाडीत बसा, मी येते…असं म्हणाली अन् तरुणी गायब

May 1, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

​ब्रेकिंग न्यूज! मंगळवेढा तालुक्यात अतिक्रमण धारकांसाठी शासनाचा ऐतिहासिक निर्णय; तहसीलदार मदन जाधव यांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

May 1, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

पुढील 48 तास अत्यंत धोक्याचे! अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका; आयएमडीकडून हाय अलर्ट

May 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

ऑल द बेस्ट! बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, HSC बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर; निकाल कुठे पाहायचा?

May 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा