मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
दहा वर्षापूर्वी एकदा किडनी प्रत्यारोपण झालेला रुग्ण पुन्हा मूत्रपिंड निकामी झाल्याने मृत्यूच्या छायेत उभा होता. नियमित डायलिसिसमुळे त्यांचे आयुष्य अत्यंत संघर्षमय झाले होते.
अशा कठीण प्रसंगात, आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त होऊ नये, म्हणून एका ५५ वर्षीय सासूने मातृत्वाचा नवा आदर्श घालत स्वतःची एक किडनी दान केली आणि आपल्या जावयाला नवजीवन दिले.

अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी) येथे शुक्रवार, ३१ जुलै रोजी ही ७५ वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली.

पुन्हा किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय
अचलपूर तालुक्यातील पारडी येथील रहिवासी देवानंद किसन चव्हाण (वय ४०) हे मागील काही महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांचे दहा वर्षांपूर्वी मुंबई येथे किडनी प्रत्यारोपण झाले होते; मात्र कालांतराने ती किडनी निकामी झाली.

त्यामुळे त्यांना जगण्यासाठी नियमित डायलिसिस करावे लागत होते. डायलिसिस करणे हा कायमस्वरूपी उपाय नसल्याने डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय सुचविला.

सासूच्या त्यागाने वाचला मुलीचा संसार
यावेळी सर्वांत मोठा प्रश्न होता, तो म्हणजे योग्य किडनी दात्याचा (डोनर). जावयाची खालावलेली प्रकृती, पोटच्या मुलीचे भविष्य आणि तिचा सुखाचा संसार डोळ्यासमोर ठेवून सासू रंजना श्रीराम सोळंके (वय ५५) यांनी धाडसी पुढाकार घेतला.

त्यांनी स्वतःची एक किडनी देण्याचा २ खंबीर निर्णय घेतला. त्यांच्या या ऐतिहासिक आणि भावनिक निर्णयामुळे केवळ एका रुग्णाचे प्राण वाचले नाहीत, तर एका संपूर्ण कुटुंबाला नव्याने उभारी मिळाली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












