mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 4, 2026
in क्राईम, राज्य
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील निळवंडी रोडवरील जाधव वस्ती येथे एका शेतकरी कुटुंबावर ओढवलेल्या भीषण प्रसंगामुळे खळबळ उडाली आहे. सर्व कर्ज वन टाईम सेटलमेंट (OTS) योजनेअंतर्गत पूर्ण भरलेले असतानाही बँकेने शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन परस्पर विकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या जमिनीचा ताबा घेण्यासाठी पोलीस आणि बँकेचे कर्मचारी गेले असता तेथे मोठी झटापट झाली.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

7 लाख 67 हजारांचे कर्ज फेडले

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी येथील एका शेतकरी कुटुंबावर बँकेचे 7 लाख 67 हजार रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज त्यांनी ‘वन टाईम सेटलमेंट’ (OTS) योजनेअंतर्गत पूर्णपणे भरले होते. असे असतानाही बँकेच्या काही स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील सेंट्रल ऑफिसला चुकीची माहिती पुरवली.

परस्पर कागदपत्रे तयार करून आणि स्थानिक एजंटशी संगनमत करून शेतकऱ्याची कोट्यवधी रुपयांची जमीन अवघ्या 73 लाख रुपयांमध्ये विकल्याचा आरोप शेतकरी कुटुंबाकडून केला जात आहे.

ताबा घेताना पोलिसांची अरेरावी

बँकेचे कर्मचारी जेव्हा या जमिनीचा प्रत्यक्ष ताबा घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्यासोबत पोलीस बंदोबस्तही उपस्थित होता. स्थानिक पोलीस प्रशासनाने जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला असता, अन्यायग्रस्त शेतकरी कुटुंबाने त्यास तीव्र विरोध दर्शवला.

या दरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी झटापट झाली. पोलिसांनी अरेरावी करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद करणाऱ्या एका युवकाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप शेतकरी कुटुंबाने केला आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

न्यायालयाच्या आदेशानेच कारवाई केल्याचा दावा

दुसरीकडे, पोलीस प्रशासनाने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. कोर्टाच्या कायदेशीर आदेशानुसारच बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत पोलीस पथक घटनास्थळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गेले होते, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

उच्चस्तरीय चौकशीची मागणी

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर (X) शेअर करत पोलीस आणि बँक प्रशासनाच्या या कारवाईचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

संपूर्ण कर्ज भरलेले असताना शेतकऱ्याची जमीन हडपणाऱ्या आणि शेतकऱ्यांवर लाठीहल्ला करणाऱ्या या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 15, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात चोरांचा उच्छाद! पोलीस प्रशासनाला उघडे आव्हान; घर बंद दिसताच घरफोडी करून ६७ हजारांचा ऐवज लांबवला; वाढदिवसाला गेले अन् चोरट्यांनी साधला डाव

August 15, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जुन्या वादातून तुफान हाणामारी; दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप, मंगळवेढा पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हे दाखल

August 13, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 13, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 13, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
Next Post
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

ताज्या बातम्या

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 15, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात चोरांचा उच्छाद! पोलीस प्रशासनाला उघडे आव्हान; घर बंद दिसताच घरफोडी करून ६७ हजारांचा ऐवज लांबवला; वाढदिवसाला गेले अन् चोरट्यांनी साधला डाव

August 15, 2026
मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

August 15, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा