मंगळवेढा टाईम्स न्युज ।
सोलापूर जिल्ह्यातील भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील भीमा नदीच्या पात्रातून नियमबाह्य पद्धतीने वाळू उपसा केल्याबद्दल ‘मंगेश इंटरप्राइजेस या कंपनीचा ठेका निलंबित झाला आहे. या कंपनीची एक कोटी २० लाख रुपयांची अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले आहेत.
मंगेश इंटरप्राइजेस कंपनीला आठ महिन्यांपूर्वी वाळू उपशाची परवानगी देण्यात आली होती. या कंपनीकडून वारंवार नियमांचे होते. उल्लंघन सुरु जिल्हाधिकाऱ्यांनी मार्च महिन्यात या ठेक्याचे निलंबन केले असल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रसिद्ध केले आहे.

त्यानंतर ठेकेदाराला आपली बाजू मांडण्याची व नियमानुसार काम करण्याची पुन्हा संधी देण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने दिलेली ही संधी गांभीर्याने न घेता ठेकेदाराकडून पुन्हा एकदा सर्रास नियमांची पायमल्ली सुरूच राहिली.

वाळू उपसा करताना यंत्रसामग्री आणि बोटींचा बेकायदेशीर वापर करण्यात आला. यासंदर्भात प्रांताधिकारी आणि मंद्रूप तहसीलदारांकडून अहवाल मागविण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ठेका निलंबित करून अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले.

या ठेकेदाराला एकूण १४ हजार ब्रास वाळू उपशाची परवानगी होती. त्यापैकी १० हजार ब्रासचा उपसा झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

स्थानिक ठेकेदार पुन्हा वादात
मंगेश इंटरप्राइजेस नावाने वाळू उपसा करणारे ठेकेदार स्थानिक आहेत. या ठेकेदारांनी यापूर्वीही वाळू उपशात गडबडी केल्या होत्या. आता पुन्हा तोच प्रकार समोर आला आहे.

गडबड झाली तर गुन्हे दाखल होतील
मंगेश इंटरप्राइजेसचा वाळू उपशाचा आणि वाहतुकीचा मक्ता रद्द झाला आहे. त्यामुळे भंडारकवठे येथील नदीपात्रातून कोणत्याही प्रकारे वाळू उपसा आणि वाहतूक होणार नाही. यात गडबड झाली तर गुन्हे दाखल होतील.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील इतर सर्व ठेकेदारांना ९ जूनपासून वाळू उपसा करण्यास मनाई केली आहे. आता केवळ साठा करून ठेवलेल्या वाळूची वाहतूक करण्यास परवानगी आहे.-विष्णू बुट्टे, तहसीलदार, मंद्रूप.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज















