mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 16, 2026
in मनोरंजन
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

टीम मंगळवेढा टाईम्स । ​सांगोला (सुरेश झिंजूरटे)

माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष तथा सांगोला नगरीचे उपनगराध्यक्ष नितीन उर्फ आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक भान जपत विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

वाढेगाव रोड येथील माणगंगा ॲग्रो मार्ट येथे भव्य मोफत सर्वधर्मीय आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराचा परिसरातील हजारो गरजू रुग्णांनी लाभ घेतला.

​शिबिरामध्ये हृदयरोग, कर्करोग, अस्थिरोग, नेत्ररोग, त्वचारोग आणि बालरोग यांसारख्या विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. नेत्र तपासणी झालेल्या रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात आले.

​मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ संपादक मोहन मस्के यांच्या हस्ते झाले. यावेळी डिजिटल मीडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सतीश सावंत, डॉ. शिवराज भोसले, डॉ. विजय बंडगर, डॉ. महादेव आलदर, डॉ. भारत गरांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष माणिकराव भोसले, ‘आपुलकी’चे अध्यक्ष राजेंद्र यादव, माणगंगा परिवाराचे व्हाईस चेअरमन सुखदेव रंदवे, संचालक सचिन इंगोले, अश्विनकुमार इंगोले, डॉ. दत्तात्रय इंगोले आणि आण्णासो केदार उपस्थित होते. सूतगिरणीचे चेअरमन डॉ. प्रभाकर माळी व सीए किसन माळी यांच्या हस्ते प्रतिमापूजन पार पडले.

​सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली.

​”अनेकांना रोजगार देणारे, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणारे आणि दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचे सुख शोधणारे आबासाहेब इंगोले हे कृतिशील व्यक्तिमत्त्व आहेत,” अशा शब्दांत मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद केदार, माजी नगरसेवक गजानन बनकर, डॉ. निरंजन केदार आणि संचालक विजय वाघमोडे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

​राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास शिवसेना नेते सागरदादा पाटील, दिग्विजयदादा पाटील, नगराध्यक्ष आनंदा माने, गटनेते प्रशांत धनवजीर, नगरसेवक अरुण पाटील, सोमेश यावलकर, काशिलिंग गावडे, जि. प. सदस्य दादासाहेब लवटे, अतुल पवार, युवासेना अध्यक्ष गुंडादादा खटकाळे, उद्योगपती प्रमोददादा साळुंखे-पाटील, विष्णुपंत केदार, विठ्ठल परिवाराचे संस्थापक दीपकराव बंदरे, पत्रकार संघटना अध्यक्ष रविराज शेटे सर, माणगंगा संस्थेच्या चेअरमन अर्चनाताई इंगोले यांच्यासह सांगोल्यातील नामांकित डॉक्टर्स, माणगंगा परिवाराचे संचालक, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक विवेक घाडगे यांनी केले, तर आभार मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय मुढे यांनी मानले.

जनसेवेचा वसा माणगंगा परिवाराच्या माध्यमातून सुरू राहील

​”वाढदिवस हे केवळ निमित्त असून शेतकरी बांधवांना सक्षम करणे आणि समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर्स व लॅब तंत्रज्ञांचे मोलाचे सहकार्य लाभले. जनसेवेचा हा वसा माणगंगा परिवाराच्या माध्यमातून अविरत सुरू राहील.”— नितीन उर्फ आबासाहेब इंगोले (संस्थापक, माणगंगा परिवार)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा पाण्याचा वनवास संपणार! आमदार आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; १९ गावांसह साठवण तलावांना थेट पाईपलाईनने मिळणार पाणी

October 29, 2026
मंगळवेढ्यात विठाई परिवार मल्टिस्टेटचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर थिरकल्या भगिनी; पैठणी, फॅन अन् रोख बक्षिसांचा पडला पाऊस; ‘गोल्डन स्टार ग्रुप’ ठरला दांडिया चॅम्पियन

मंगळवेढ्यात विठाई परिवार मल्टिस्टेटचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर थिरकल्या भगिनी; पैठणी, फॅन अन् रोख बक्षिसांचा पडला पाऊस; ‘गोल्डन स्टार ग्रुप’ ठरला दांडिया चॅम्पियन

October 19, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
Next Post
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

​मांजराने उघड केला चोरीचा कट! झोपेत असताना घरात शिरला चोरटा; देव्हाऱ्याखालून सोन्याचे दागिने पळविले; मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल

October 30, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकरी अन् नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; दुष्काळी ‘वॉर रूम’ सुरू, ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती; ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

October 31, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा पाण्याचा वनवास संपणार! आमदार आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; १९ गावांसह साठवण तलावांना थेट पाईपलाईनने मिळणार पाणी

October 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा