टीम मंगळवेढा टाईम्स ।
विठाई परिवार मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मंगळवेढा यांच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक यांचा भव्य गौरव व सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

मंगळवेढा येथील एमआयडीसी परिसरातील ‘हॉटेल स्वाद एक्झिक्युटिव्ह’ येथे शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा दिमाखदार कार्यक्रम पार पडला.

शिक्षकांच्या अमूल्य कार्याचा गौरव करण्यासोबतच संस्थेने अल्पावधीत गाठलेल्या ऐतिहासिक व्यावसायिक टप्प्याचा आनंदोत्सवही यावेळी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध शिक्षक नेते मा. सुरेश पवार गुरुजी होते, तर व्यासपीठावर माजी केंद्रप्रमुख विठ्ठल काळुंगे गुरुजी व बुगडे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षकांनी पिढ्या घडवण्याचे महान कार्य केले: चेअरमन स्वप्निल काळुंगे
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे चेअरमन स्वप्निल काळुंगे यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “शिक्षकांनी केवळ पुस्तकी ज्ञान न देता समाज घडवणारे जबाबदार नागरिक निर्माण केले आहेत. अशा गुरुजनांचा सन्मान करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे.

” तसेच सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच संस्थेने यशाचा ऐतिहासिक टप्पा गाठल्याचे सांगत त्यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “आपल्या सहकार्याने आम्ही गाठला हा टप्पा, आपल्या विश्वासानेच पुढे वाटचाल दुप्पट वेगाने!” असा दृढ विश्वासही यावेळी संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

मान्यवरांचे मनोगत व संस्थेच्या प्रगतीचे कौतुक:
सुरेश पवार गुरुजी (अध्यक्षीय मनोगत): विठाई परिवार आधुनिक तंत्रज्ञान आणि पारदर्शक बँकिंग व्यवहारांच्या जोरावर सहकार क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत असून संस्थेची प्रगती अत्यंत उल्लेखनीय आहे.
मारुती काळुंगे गुरुजी (केंद्रप्रमुख): संस्थेने अत्याधुनिक डिजिटल बँकिंग, डिजिटल पिग्मी आणि आपुलकीची सेवा याद्वारे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
विठ्ठल ताटे गुरुजी (माजी चेअरमन, शिक्षक सोसायटी): संस्थेचे आर्थिक व्यवहार अतिशय पारदर्शक असून संस्थेचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे.
मेघश्याम सुरवसे सर: विठाई परिवार केवळ आर्थिक व्यवहारांपुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था म्हणून काम करत आहे.
आवताडे सर, केंद्रप्रमुख जगताप सर व सौ. ज्योती कालूबर्मे मॅडम यांनीही संस्थेच्या समाजभिमुख कार्याचा गौरव करत चेअरमन यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुरज काळुंगे, व्यवस्थापक गजानन काळुंगे यांच्यासह सर्व कर्मचारीवृंद, सभासद आणि मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन माने सर यांनी केले, तर आभारप्रदर्शन सौ. शिंदे मॅडम यांनी केले. कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













