टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर ग्रामीण भागात बेकायदा वाळू चोरीसह मालमत्ता आणि शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांनी धुमाकूळ घालणाऱ्या सराईत गुन्हेगार महादेव मारुती इरकर (रा. भाळवणी, ता. मंगळवेढा) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.

जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर फरार झालेल्या इरकरला पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून शिताफीने बेड्या ठोकत त्याची थेट पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश :
गुन्हेगारी कारवायांना वेसण घालण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी इरकरविरुद्ध ‘एमपीडीए’ (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचे आदेश जारी केले होते.।
फरार आरोपीचा माग :
कारवाईची कुणकुण लागताच आरोपी पोलिसांना चकवा देऊन पसार झाला होता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवेढा पोलिसांच्या पथकाने सातारा जिल्ह्यातील माण परिसरात सापळा रचून १५ सप्टेंबर रोजी त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

येरवडा कारागृहात रवानगी :
सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १६ सप्टेंबर रोजी त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.

ही धडक कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढ्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या कठोर कारवाईमुळे परिसरातील वाळू माफिया आणि गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










