पंढरपूर : राजेंद्र फुगारे (मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क)
राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला होता. यामध्ये राष्ट्रवादीत दोन भाग पडले होते. अशातच विठ्ठल सह साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी मात्र शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठेने उभे राहण्याचा निर्णय घेतला होता.
याबाबतीत मिळालेले फलित म्हणून थेट अभिजीत पाटील यांना रक्षाबंधनाच्या दिवशी खा.सुप्रिया सुळे यांनी राखी बांधले असल्याने निष्ठा मजबूत झाली आहे. ही राखी म्हणजे पंढरपूर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील मुंबई यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी अभिजीत पाटील यांना राखी बांधली आहे.
राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घडामोडीत सत्तेकडे न झुकता केवळ पवार यांच्यावर मनापासून निष्ठा ठेवली आहे.
यामुळे अवघ्या सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार गटाची महत्वाची जबाबदारी चेअरमन अभिजित पाटील यांच्यावर येणार असून पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्याचे केंद्रबिंदू ठरणार आहे. हे मात्र नक्की दिसत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज