mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुर ब्रेकिंग! आता ग्रामीणमध्ये दुकानदाराला मास्क नसेल तर होणार परवाना रद्द

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 5, 2020
in सोलापूर
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

सोलापूर जिल्ह्यात माझे गाव कोरोनामुक्त ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गावातील दुकानदारांना मास्क नसेल तर दुकानाचा परवानाच रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा टप्पा संपल्यानंतर जिल्हा परिषदेने ‘माझे गाव कोरोनामुक्त’ ही मोहीम हाती घेतली आहे.

गावे कोरोनामुक्त करण्याच्या मोहिमेचे उद्दिष्ट असून, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता गावपातळीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

गावातील प्रत्येकाने मास्क घातलाच पाहिजे. रस्त्यावर विनामास्क आढळणाऱ्यांना ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि आरोग्य सेवकांमार्फत तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

पहिल्यांदा दुकानदार, रस्त्यावरील भाजीविक्रेते, बसस्थानक, सरकारी कार्यालयात येणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे.

या मोहिमेचा एक भाग म्हणून १५ डिसेंबर रोजी सर्व गावात आरोग्य व ग्रामपंचायत विभागामार्फत प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात येणार आहे.

७ डिसेंबर रोजी ७ गावात या मोहिमेला सुरुवात करण्यात येईल. जिल्ह्यात अद्यापही कोरोना रुग्ण आढळत आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी चाचण्या वाढविण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा तपासणी करण्यात येईल.

नवीन वर्षात ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण अत्यंत कमी करण्यावर भर असेल, असे स्वामी यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव उपस्थित होते.

खोकलले तरी नागरिक घाबरतात, म्हणून आंबट पदार्थ वर्ज्य केले. लोकांमध्ये मिसळण्यासाठी १८ वेळा कोरोना चाचणी केल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सांगितले. त्यामुळे शंका आली की चाचणी करा व कोरोनाला घाबरू नका, असे आवाहन यावेळी केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मास्क वापरासोलापूर कोरोनासोलापूर जिल्हा परिषद

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

‘सभा मंडप नको, रस्ते, पाणी आणि शाळा द्या!’ : मंगळवेढ्यात ग्रामस्थांची बदलती मानसिकता; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी, चाऱ्याला प्राधान्य देण्याची मागणी

October 31, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकरी अन् नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; दुष्काळी ‘वॉर रूम’ सुरू, ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती; ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

November 4, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

संतापजनक! ​रात्री सर्वांसोबत जेवण, सकाळी खोलीत आढळला मृतदेह; लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी नेमकं काय घडलं?

October 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! २७ ऑक्टोबरला शाळा-अंगणवाड्यांत मिळणार मोफत ‘या’ गोळ्या; जाणून घ्या संपूर्ण नियोजन

October 24, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सक्तीने कर्जवसुली कराल तर खबरदार..! मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट कारवाईचा इशारा; शेतकऱ्यांशी २४ तास संवाद : टँकर, चाऱ्यासह सर्वांची व्यवस्था होणार

October 20, 2026

जमिनीच्या तुकड्यासाठी नात्यांचा खून! सासर्‍याने सुनेच्या डोक्यात घातला कुऱ्हाडीचा दांडा; सासूने दिली थेट जिवे मारण्याची धमकी

October 21, 2026
Next Post

लग्नसराई निमित्ताने गजानन रत्नपारखी ज्वेलर्समध्ये नवरीच्या अलंकार खरेदीवर पैठणी मोफत मिळणार

ताज्या बातम्या

अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

ना कोर्ट, ना वकील! तहसीलदारांच्या मध्यस्थीने रस्त्यांचे वाद जागेवरच मिटले; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

November 6, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात खळबळ! ४० वर्षीय शेतकरी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, पत्नीची पोलिसांत तक्रार

November 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘दोन अपत्यांची अट’ आता कालबाह्य: सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण; ​२००३ च्या निकालाचा फेरविचार होणार

November 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

दिवाळीच्या तोंडावर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना दिलासा! शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी ५ हजार रुपयांची दुष्काळी मदत जमा; बँकांनी थकीत कर्जापोटी पैसे कपात केल्यास कारवाईचा इशारा

November 4, 2026
महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

महिलांसाठी खुशखबर! मंगळवेढ्यात आता एकाच छताखाली मिळणार स्वस्त व ब्रँडेड वस्तू; ‘बाहुबली लेडीज मॉल’चा भव्य शुभारंभ

November 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा