mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जोरदार तयारी! लाडक्या बहि‍णींना कुणी साड्या वाटल्या, कुणी सायकली; भाजपचे आजी-माजी आमदार आमने-सामने; बहुरंगी लढत होणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 2, 2024
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
खळबळ! आमिष दाखवून आमचा गट फोडण्याचा प्रयत्न; प्रशांत परिचारक, शिवानंद पाटलांचा आमदार आवताडे गटावर गंभीर आरोप

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली असून राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी भाजपचे सर्व आमदार पाडण्याची घोषणा केली असताना आता भाजपकडून महिला वर्गाला साद घालण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

राज्यात लाडकी बहीण योजना आल्यानंतर महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने निवडणुकीत फायदा होईल, असे नेत्यांना वाटते. त्यामुळे, या लाडक्या बहीण योजनेच्या अनुषंगाने पंढरपूरचे विद्यमान भाजप आमदार समाधान आवताडे यांनी रक्षाबंधन कार्यक्रमाला सुरुवात केली,

पंढरपूर परिसरात झालेल्या त्यांच्या या कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तर, दुसरीकडे भाजपचे प्रशांत परिचारक यांनीही महिला वर्गासाठी कार्यक्रम आखल्याचे दिसून आले. त्यामुळे, दोन्ही इच्छुक उमेदवार आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.

पंढरपूर तालुक्यातील टाकळी, कासेगाव अशा गावात हजारो महिलांनी रक्षाबंधन कार्यक्रमासाठी गर्दी केल्याने लाडकी बहीण योजना लोकप्रिय होत असल्याचे दिसत आहे.

येथे भाजप आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या कुटुंबासह हजेरी लावत महिलांना रक्षाबंधनाची भेट म्हणून साड्यांचे वाटप केले. समाधान आवताडे हे देखील स्ट्राँग मराठा आमदार म्हणून ओळखले जातात, सर्व मराठा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

मात्र, जरांगे पाटील यांनी भाजप आमदार पाडण्याची घोषणा केल्यानंतर आवताडे यांनी आता महिला वर्गाला साद घालत धाकट्या भावाच्या पाठीमागे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठीच, हे कार्यक्रम सुरू असल्याचे दिसून येते.

दुसरीकडे पंढरपूर मंगळवेढ्यातून इच्छुक असलेले भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी देखील महिला आणि तरुण मतदारांना साद घालत आपल्या वाढदिवशी शहरातील इसबाबी परिसरात शाळकरी मुलींना सायकलीचे वाटप करत एक मोठा कार्यक्रम घेतला.

या कार्यक्रमालाही मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी होत परिचारकांना सपोर्ट असल्याचे दाखवून दिले. वास्तविक परिचारक यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याने त्यांच्या समर्थकांनी शरद पवारांची तुतारी हाती घेण्याची मागणी केली आहे.

मात्र, यावेळी परिचारक यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यास ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरायची शक्यता आहे. अशावेळी त्यांनीही पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यात जोरदार तयारी सुरू केली आहे.

पंढरीत बहुरंगी लढत होणार

भाजपचेच दोन आजी-माजी आमदार आमने-सामने उभे ठाकल्याने त्यांची मदार महिला भगिनी मतदारांवर असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच दोन्ही आमदारांकडून महिलांना खुश करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

विशेष म्हणजे आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत परिचारक या दोघांनीही या कार्यक्रमानंतर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यामुळे, आता या विधानसभेला आवताडे आणि परिचारक हे दोघेही निवडणूक रिंगणात असणार असून परिचारक महाविकास आघाडीतून उभारणार कि अपक्ष हेही लवकरच समोर येईल.

गेल्यावेळी 2021 साली दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार आवताडे यांना विजयी करण्यासाठी भाजप नेत्यांनी परिचारक यांना अवताडेंच्या पाठिशी उभे राहण्याचे सांगितले, ज्यामुळे भाजपने ही जागा जिंकली होती.

आता, परिचारक आणि आवताडे हे दोघेही रिंगणात उतरल्यास भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. गेल्यावेळी थोडक्या मतात पराभूत झालेले भगीरथ भालके यांनीही महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागितली तर भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली आहे सावंत यांना कामाला लागा असा आदेश दिला असल्याचे समजते त्यामुळे येथील लढत बहुरंगी होणार हे नक्की.

त्यामुळे, पंढरीच्या बहुरंगी लढतीत आमदार समाधान अवताडे हे आपली आमदारकी टिकविण्यासाठी जोरदार तयारीला लागल्याचे दिसून येते.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडेमाजी आमदार प्रशांत परिचारक

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 25, 2026
Next Post
लाडक्या बहिणींची ‘कटकट’ मिटली, सरकारचा नवा शासन निर्णय; आता विधानसभा क्षेत्रातच निपटारा होणार

महिलांनो खुशखबर! लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ, शासनाचा मोठा निर्णय; आता महिलांच्या खात्यात येणार 'एवढे' हजार रुपये

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा