टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव ते गुंजेगाव असणाऱ्या शेतातील एका घरामध्ये काही इसम चोरुन ५२ पानी पत्यावर पैशाची पैज लावुन मन्ना नावाचा जुगार खेळनाऱ्या
आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ९ लाख ६२ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्याद लक्ष्मी दहवडी बीटचे अंमलदार नागेश निंबाळकर यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दि.१६ मार्च रोजी औदुंबर चव्हाण यांच्या आंधळगाव ते गुंजेगाव रस्त्यालगत शेतातील घरात ५२ पानी जुगार खेळताना आठ लोक गोलाकार बसलेले दिसले.
पकडलेल्या इसमांकडे पंचासमक्ष त्यांची नावे व पत्याबाबत विचारपूस करता त्यांची नावे विनोद शिंदे (रा. लक्ष्मी दहवडी), हरी चंदनशिवे (रा. आंधळगाव), विजय यादव (रा. मारापूर, ता. मंगळवेढा) असे असल्याची सांगितली.
पळून गेलेल्या इसमांबाबत पंचासमक्ष विजय यादव यांना विचारले असता त्यांनी त्यांची नावे श्रीकांत साळे, नीलेश लेंडवे, दत्तात्रय लवटे असे असल्याची सांगितले तसेच अजून दोघेजन पळून गेले असून, त्यांची नावे माहीत नाहीत, असे आरोपींनी सांगीतले.
त्यानंतर फिर्यादीने त्यास क्लब कोण चालवतो याबाबत विचारपूस केली असता त्याने नीलेश लेंडवे हा क्लब चालवतो, असे सांगितले.
तसेच हरी चंदनशिवे यांना घर कोणाचे आहे असे विचारले असता त्याने घर हे औदुंबर रणदिवे याचे असल्याबाबत सांगितले, फिर्यादीने आरोपीविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर आठ जणाांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अंगझडती घेतली असता आरोपीकडून जुगार साहित्य, जुगार खेळण्यासाठी वापरण्यात आलेली वाहने व ९ लाख ६२ हजारांचा मुददेमाल जप्त केला. तपास पोलिस पोहेकॉ श्रीमंत पवार करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज