mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बँकेची दिशाभूल करण्यासाठी एक थक्क करणारा देखावा; रचला स्वतःच्या मृत्यूचा कट, दारू पाजून मित्रालाच संपवलं; 8 महिन्यानंतर थरारक घटनेचा उलगडा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 17, 2026
in क्राईम, राज्य
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

मानवी क्रुरतेची परिसीमा ओलांडणारी आणि कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करणारी एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. शिस्तबद्ध कट, अत्यंत थंड डोक्याने केलेला खून आणि त्यानंतर स्वतःचा मृत्यू आभासी पद्धतीने प्रस्थापित करण्याचा अघोरी प्रयत्न, चित्रपटाच्या पटकथेसारखं भासावं अशा एका शिस्तबद्ध खू नाच उलगडा करण्यात पोलिसां ना यश आले आहे.

मृताच्या भावाला संशय आल्याने पोलिसात तक्रार दाखल केल्याने घटनेचे बिंग फुटलं आहे . दरम्यान , अशा या गुंतागुंतीच्या हत्याकांडाचा आमगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून देवरी येथील अर्बन बँकेच्या 5 लाखांच्या पोल्ट्री फार्म व्यवसायाच्या कर्जातून आणि कायदेशीर  कचाट्यातून सुटण्यासाठी एका 28 वर्षीय तरुणाने आपल्याच गावातील निष्पाप मित्राचा बळी दिल्याचे पुढे आले आहे.

परिणामी , तब्बल 8 महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या जिवंत गुन्हेगाराला अखेर अटक करण्यात आली असून, त्याच्याच वडिलांनी त्याला पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

स्वतःलाच ‘मृत’ घोषित करण्याचा एक भयानक कट

देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असलेला आरोपी अंतिम ओमप्रकाश खोटेले (28) याने पोल्ट्री फार्मच्या व्यवसायासाठी देवरी येथील अर्बन बँकेकडून 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, व्यवसायात यश न आल्याने तो प्रचंड तणावात होता.

या कर्जातून कायमची सुटका करून घेण्यासाठी त्याने स्वतःलाच ‘मृत’ घोषित करण्याचा एक भयानक कट रचला. या विळख्यातून सुटण्यासाठी त्याने आपल्याच गावातील मित्र चंद्रकुमार सराटे (46) यांचा खून करण्याचा बेत आखला.

28 ऑगस्ट 2025 रोजी मध्यरात्री आरोपी अंतिम खोटेले हा चंद्रकुमार सराटे यांच्या घरी गेला. ‘काहीतरी काम आहे’, असे सांगून त्याने चंद्रकुमार यांना विश्वासाने आपल्या दुचाकीवर बसवले. तिथून तो त्यांना बाह्मणी येथील रेल्वे पटरीच्या दिशेने घेऊन गेला. तिथे चंद्रकुमार यांना जबरदस्तीने दारू पाजली.

बँकेची दिशाभूल करण्यासाठी एक थक्क करणारा देखावा उभा केला

दरम्यान, मद्याच्या प्रभावामुळे चंद्रकुमार जेव्हा पूर्णपणे असहाय्य झाले, तेव्हा 29 ऑगस्ट 2025 च्या पहाटे आरोपी अंतिम खोटेले याने स्वतःच्या दुपट्याने चंद्रकुमार यांचा गळा आवळला. काही क्षण चाललेल्या तडफडाटानंतर चंद्रकुमार सराटे यांची प्राणज्योत मालवली. हत्या केल्यानंतर आरोपीने पोलिसांची आणि बँकेची दिशाभूल करण्यासाठी एक थक्क करणारा देखावा उभा केला.

त्याने मृत चंद्रकुमार यांच्या शरीरावरील कपडे बदलून त्यांना स्वतःचे कपडे घातले. रेल्वे दुर्घटनेत मरण पावलेली व्यक्ती ही चंद्रकुमार नसून स्वतः ‘अंतिम खोटेले’ आहे, असे सर्वांना वाटावे म्हणून त्याने मृतदेहाच्या खिशात स्वतःचे ओळख पटवणारी कागदपत्रे (आधारकार्ड) आणि एटीएम कार्ड मुद्दाम ठेवून दिले.

जगाच्या नजरेत ‘मृत’, बँकेचे 5 लाखांचे कर्जही त्याच्या मृत्यूसोबत संपले, पण…

आपली दुचाकीही त्याने त्याच घटनास्थळावर, म्हणजे बाह्मणी रेल्वे (आमगाव-देवरी महामार्ग) पटरीपासून तीन किलोमीटर पूर्व दिशेला सोडून दिली आणि तो स्वतः रात्रीच्या अंधारात फरार झाला. या हुशारीमुळे आठ महिन्यांपर्यंत तो जगाच्या नजरेत ‘मृत’ होता आणि बँकेचे 5 लाखांचे कर्जही त्याच्या मृत्यूसोबत संपले, असे दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता.

चंद्रकुमार सराटे यांचे भाऊ रमेश सराटे (वय 43, रा. डोंगरगाव) यांच्या मनात या घटनेबाबत आणि चंद्रकुमार यांच्या बेपत्ता असण्याबाबत तीव्र संशय निर्माण झाला होता. अखेर त्यांनी आमगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. आमगाव पोलिसांनी तांत्रिक तपास करत ज्याला जग मृत मानत होते, तो अंतिम खोटेले प्रत्यक्षात जिवंत आहे, हे सिद्ध केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बँकेचे कर्ज

संबंधित बातम्या

मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

सावकारांनो सावधान! शेतकऱ्यांना अडचणीत आणाल तर थेट…. मंत्री बावनकुळेंचा इशारा, पोलिसांना सूचना, बँकांनांही दिली ताकीद

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 8, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

दहावीत ९१ टक्के! 'अभ्यास कर' म्हणणे एवढे झोंबले? नवीन मोबाईल आणल्यानंतर काही तासांतच १६ वर्षांच्या शिवमचा टोकाचा निर्णय

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 10, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मृतांच्या टाळूवरचं लोणी! कोरोनातील २२ मृतांवर कागदोपत्री ‘उपचार’ दाखवून लाटले २ कोटी; मृत्यूनंतर ६ वर्षांनी ‘उपचार’?

October 9, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा