टीम मंगळवेढा टाईम्स ।
हार कोमेजतात, पुष्पगुच्छ सुकतात… पण मातीत रुजलेले नाते वर्षानुवर्षे बहरत राहते याच भावनेतून आज १८ मे रोजी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे सरांचा वाढदिवस अत्यंत अनोख्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या वाढदिवसाला हार, शाल किंवा फेटा न आणता, निसर्गाला संजीवनी देणारे एक छोटेसे रोपटे भेट देऊन ढोबळे सरांना शुभेच्छा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

’सावली निवास’ येथे होणार सोहळा
ढोबळे सरांना शुभेच्छा देण्यासाठी आज १८ मे रोजी ‘सावली निवास’ येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देता येणार आहेत.

अशी असेल वाढदिवसाची संकल्पना
हार-शाल नाकारली: यंदाच्या वाढदिवसाला महागडे हार, फेटे आणि शाल यांसारख्या अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात आला आहे.

पर्यावरणाची साथ: त्याऐवजी कमी पाण्यात वाढणारी आणि मोठी सावली देणारी झाडे (रोपटे) ढोबळे सर भेट म्हणून स्वीकारली जातील.

भविष्यासाठी ऑक्सिजन: ही रोपटी लावून निसर्गाला प्राणवायू देण्याचा आणि वाढदिवस संस्मरणीय बनवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

”वाढदिवस आनंदाचा, संकल्प पर्यावरणाचा” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, सर्व स्नेही आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पर्यावरणपूरक मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













