mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जमीन हडपण्याची भीती संपली! शेतजमीन भाडेपट्ट्यासाठी सरकारचा नवा कडक कायदा; या’ नव्या नियमामुळे पडीक जमिनी ओलिताखाली येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 18, 2026
in राज्य, शैक्षणिक, सोलापूर
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

शेतजमीन मालक आणि भाडेपट्टेधारक शेतकऱ्यांचे वाद मिटविणे तसेच शेती व्यवस्थेत कडक पारदर्शकतेसाठी महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्टा नियम, २०२४ ची अंमलबजावणी सुरू केली आहे.

राज्य सरकारच्या या नियमाच्या कडक अंमलबजावणीमुळे जमिनीचे तोंडी वा साध्या कागदावरील व्यवहार इतिहासजमा होतील. भाडेपट्ट्यावर शेती करणाऱ्यांना आता पीककर्ज तर मिळणार आहेच; शिवाय पीकविमाही मिळणार आहे.

राज्य सरकारने ‘महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्टा नियम, २०२४’ची अंमलबजावणी सुरू केली आहे. प्रत्येक कडक करार अधिकृतपणे नोंदणीकृत करणे बंधनकारक झाले आहे.

यापुढे केवळ तोंडी शब्दांवर किंवा साध्या कागदावर (स्टॅम्प पेपरशिवाय) केलेले शेतीचे व्यवहार बेकायदेशीर ठरतील.

नोंदणी बंधनकारक :

जमिनीचा मालक आणि भाडेपट्टेधारक यांच्यात होणारा प्रत्येक करार महसूल विभागाकडे अधिकृतपणे नोंदवला जाणे सक्तीचे आहे.

अनेकदा नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे जमीनमालक शेती करू शकत नाहीत आणि जमीन पडीक राहते. नव्या नियमांमुळे मूळ मालकाला जमीन हक्क गमावण्याची भीती न बाळगता कायदेशीररीत्या भाड्याने देऊन उत्पन्न मिळवता येईल. गावातील भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना या नियमामुळे हक्काची जमीन उपलब्ध होईल.

अधिकृत करारनामा असल्यामुळे बँका भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘पीक कर्ज’ देण्यास नकार देऊ शकणार नाहीत. नैसर्गिक आपत्ती आल्यास पिकाचे नुकसान झाल्यास, शासकीय मदत आणि पीकविम्याचा थेट लाभ मूळ मालकाऐवजी प्रत्यक्ष शेती करणाऱ्या पट्टेधारकाला मिळेल.

करार संपताच जमीन मूळमालकाकडे परत मालकी हक्काची हमी या कायद्यात आहे. या नियमातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कराराची मुदत संपताच जमिनीचा ताबा कोणत्याही वादाशिवाय मूळ मालकाकडे परत जाईल.

जमीन हडपण्याची भीती नाही :

भाडेपट्टेधारक जमिनीवर कोणत्याही मालकी हक्काचा दावा करू शकणार नाही, अशी कडक कायदेशीर तरतूद यात आहे.

करारनामा हा विशिष्ट कालावधीसाठीच (उदा. १ ते ५ वर्षे किंवा परस्पर संमतीने) करता येईल. कराराच्या वेळीच वार्षिक भाडे (खंड) किंवा उत्पन्नातील हिस्सा किती असेल, हे लिखित स्वरूपात निश्चित होईल.

जमीनमालकाचा मालकी हक्क पूर्णपणे सुरक्षित

राज्य शासनाने लागू केलेले ‘शेतजमीन भाडेपट्टा नियम, २०२४’ हे शेती क्षेत्रात क्रांती घडवणारे ठरतील. यामुळे जमीनमालकाचा मालकी हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतो, ग्रामीण भागातील शेतीविषयक वाद संपवण्यासाठी आणि पडीक जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी करारांची अधिकृत नोंदणी करून घ्यावी.-किरण जमदाडे, तहसीलदार

महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्टा नियम, २०२४’

पारदर्शकतेचे नवे पर्व : राज्यातील शेती क्षेत्राला कायदेशीर स्थैर्य देण्यासाठी आणि जमीनमालक व कूळ (भाडेकरू) यांच्यातील संबंध सुदृढ करण्यासाठी हा नवा नियम लागू केला आहे.(स्रोत:लोकमत)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतजमीन भाडेतत्त्वावर

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

कोचिंग क्लासेसवर येणार कडक निर्बंध; महाराष्ट्र सरकार लावणार शिस्त; दिवसाला ५ तासांची मर्यादा; ‘इतक्या’ वर्षांखालील मुलांना प्रवेश मनाई, शुल्कवाढीलाही लगाम

August 26, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतीत जाऊनही ग्रामसेवक भेटत नाही? राज्य सरकारने गुपचूप घेतला ‘हा’ मोठा निर्णय; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
Next Post
महाराष्ट्र केसरी! सिकंदर शेख पराभूत, मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड फायनलमध्ये

हिंदकेसरी! महेंद्र गायकवाडचा शातिर डाव, 2 पाईंट अन् पृथ्वीराजचा हात मोडला, फायनलमध्ये 18 सेकंदाच्या कुस्तीच्या ड्रामा; पाहा व्हिडीओ...

ताज्या बातम्या

मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यास राष्ट्रीय कृषी पुरस्कार; भारतीय कृषी अनुसंधान परिषेदेची घोषणा

संतभूमी मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांची वज्रमूठ; पक्षभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन

August 27, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा