mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 12, 2026
in क्राईम, सोलापूर
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

टीम मंगळवेढा टाईम्स न्युज। ​सांगोला

राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. याचाच प्रत्यय शनिवारी (११ जुलै) सांगोला तालुक्यातील जवळा येथे आला.

जवळा येथील ‘सोनाई उद्योग समूहा’च्या अजिंक्यराणा दूध संकलन केंद्रावर प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल १५ लाख रुपये किमतीचे ३७ हजार ५३२ लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आणि त्याची जागीच विल्हेवाट लावली. या कारवाईमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायातील काळ्या धंद्यांचे धाबे दणाणले आहेत.

​काय आहे नेमकं प्रकरण?

​जवळा जवळील बुरंगेवाडी येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी ‘अजिंक्यराणा दूध संकलन केंद्र’ सुरू झाले होते. या केंद्रावरून ‘सोनाई उद्योग समूहा’ला दुधाचा पुरवठा केला जात असे. अत्यंत कमी कालावधीत या केंद्रावर हजारो लिटर दूध जमा होऊ लागल्याने, परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.

येथे मोठ्याप्रमाणावर दुधात भेसळ होत असल्याची कुजबुज जवळा परिसरात सुरू होती. अखेर ही खात्रीशीर माहिती अन्न व औषध प्रशासनापर्यंत पोहोचली आणि अधिकाऱ्यांनी थेट धाड टाकली.

दुधात भेसळ करण्याचा हा गोरखधंदा परिसरातील संदीप उर्फ गोट्या समाधान गावडे, श्रीकांत समाधान गावडे, विजय शामराव पाटील व इतर मंडळींकडून चालवला जात असल्याची जोरदार चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.

​कारवाईत उघड झालेली धक्कादायक बाबी:

​शनिवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने बुरंगेवाडी येथील केंद्रावर अचानक छापा टाकला आणि दुधाचे नमुने तपासले. या तपासणीत अधिकारीही चक्रावून गेले. कारवाईदरम्यान खालील गंभीर बाबी समोर आल्या:

​परवान्याचा पत्ताच नाही: या दूध संकलन केंद्राकडे संकलन आणि चिलिंग युनिटचा कोणताही वैध परवाना नव्हता.

​SNF चे प्रमाण अत्यंत कमी: जागेवरच केलेल्या चाचणीत दुधातील SNF (Solid Not Fat) चे प्रमाण सरकारी नियमांपेक्षा अत्यंत कमी आढळले, ज्यामुळे भेसळ सिद्ध झाली.

​नोंदवहीत सावळागोंधळ: माल कुठून आला, कोणाला विकला, याची कोणतीही पद्धतशीर नोंद केंद्रावर उपलब्ध नव्हती.

​नियमांची पायमल्ली: अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या जवळपास सर्वच नियमांचे येथे उल्लंघन होत असल्याचे उघड झाले.

​अन्नसुरक्षा आयुक्त साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी गणेश कदम आणि अन्नसुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या पथकाने हा धाडसी छापा टाकला. गुन्हा सिद्ध होताच आरोग्याशी खेळणारे ३७ हजार लिटरहून अधिक दूध नष्ट करण्यात आले.

​सांगोला तालुक्यात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याने, सामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या या निर्भीड कामगिरीचे मनापासून कौतुक केले आहे. “आता तरी दुधातील काळाबाजार थांबणार का?” असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 15, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात चोरांचा उच्छाद! पोलीस प्रशासनाला उघडे आव्हान; घर बंद दिसताच घरफोडी करून ६७ हजारांचा ऐवज लांबवला; वाढदिवसाला गेले अन् चोरट्यांनी साधला डाव

August 15, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 16, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जुन्या वादातून तुफान हाणामारी; दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप, मंगळवेढा पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हे दाखल

August 13, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 13, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेश शेती दौऱ्यावर जाण्याची संधी; कृषी विभागाकडून अर्ज करण्याचे इच्छूक शेतकऱ्यांना आवाहन

August 13, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
Next Post
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

ताज्या बातम्या

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 15, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात चोरांचा उच्छाद! पोलीस प्रशासनाला उघडे आव्हान; घर बंद दिसताच घरफोडी करून ६७ हजारांचा ऐवज लांबवला; वाढदिवसाला गेले अन् चोरट्यांनी साधला डाव

August 15, 2026
मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

August 15, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा