टीम मंगळवेढा टाईम्स ।
स्व. जनाबाई बाबूराव आवताडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज, मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी विशेष कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात अहिल्यानगर येथील प्रसिद्ध कीर्तनकार हिंदूभूषण सुनिताताई आंधळे यांचे सुश्राव्य कीर्तन रंगणार असल्याची माहिती आवताडे परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे.

खंडोबा गल्ली येथील आवताडे यांच्या निवासस्थानी सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत हा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर दुपारी १२ वाजता विधिवत पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

या भक्तीमय कार्यक्रमास सर्व भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बबनराव आवताडे, विष्णूपंत आवताडे, आमदार समाधान आवताडे व समस्त आवताडे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज
















