मंगळवेढा टाईम्स न्युज।
पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा शेतीवर परिणाम होत असतानाच कर्जबाजारीपणाच्या वाढत्या आर्थिक ताणातून शेतकरी कुटुंबांसमोरील संकट अधिक गडद होत आहे.
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात एका अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात कर्ज आणि नापिकीमुळे विषारी कीटकनाशक प्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या सलग घटनांमुळे दुष्काळाच्या झळा आणि शेतीतील आर्थिक संकट पुन्हा अधोरेखित झाले आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव बोरी येथील ३३ वर्षीय अंकुश काळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. काळे हे अल्पभूधारक शेतकरी होते.

पावसाअभावी शेतीचे नुकसान झाल्याने तसेच कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे ते आर्थिक अडचणीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या नावावर एसबीआयच्या निटूर शाखेचे सुमारे एक लाख रुपये, तर डीसीसी बँकेचे सुमारे ४० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते.

दुष्काळामुळे शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला होता. आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे डोंगरगाव बोरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन मदत करावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कासारी येथील ५५ वर्षीय शेतकरी सुभाष भानुदास माळी यांनी दोन दिवसांपूर्वी शेतात विषारी कीटकनाशक प्राशन केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कासारी येथील ५५ वर्षीय शेतकरी सुभाष भानुदास माळी यांनी दोन दिवसांपूर्वी शेतात विषारी कीटकनाशक प्राशन केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












