मंगळवेढा टाईम्स न्युज ।
सोलापूर शहरातील नेहरूनगर येथील श्री सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन महाविद्यालयात केंद्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती’चा गैरलाभघेण्यासाठी २३ बनावट विद्यार्थी दाखवून शासनाची १ लाख ८३ हजार ९०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदिराराजे भोसले यांच्याविरूद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार १ ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत घडला आहे. आरोपी इंदिराराजे भोसले यांनी इलेक्ट्रॉनिक साधनांचा आणि मोबाइल क्रमांकाचा वापर करून संबंधित महाविद्यालयाचा एक बनावट युझर आयडी तयार केला.

स्वतः संस्थेचे प्रमुख आणि इन्स्टिट्यूट नोडल ऑफिसर असल्याचे भासवून त्यांनी बनावट पद धारण केले. आरोपीने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची सर्व मूळ कागदपत्रे बनावट पद्धतीने तयार केली.

एकूण २३ विद्यार्थी खोटे दाखवून त्यांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरले. शासनाकडून मंजूर झालेली एकूण १ लाख ८३ हजार ९०० रुपयांची शिष्यवृत्तीची घेत शासनाची आर्थिक फसवणूक केली.

पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी संजय कोंडिबा भांदिर्गे (वय ५७ वर्षे, रा. जुने कलेक्टर कंपाउंड, सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. विजापूर नाका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वराळे हे तपास करीत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












