मंगळवेढा टाईम्स न्यूज ।
मंगळवेढा शहरात कर्कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मंगळवेढा पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे.
मंगळवेढा उपविभागाचे डीवायएसपी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ‘स्पेशल ड्राईव्ह’ राबवत तब्बल ११ वाहनांचे मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले,

तसेच विना नंबर प्लेट फिरणाऱ्यांवर ई-चलनद्वारे दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
शहरातील शांतता बिघडवणाऱ्या आणि कर्णकर्कश आवाजाने नागरिकांना त्रास देणाऱ्या ‘सायलेन्सर’ बहादरांना चाप लावण्यासाठी मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागाने ही धडक कारवाई केली.

’त्या’ सायलेन्सरवर फिरले कटर; वाहनचालकांचे केले समुपदेशन
या मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आलेले बेकायदेशीर मॉडिफाईड सायलेन्सर पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. केवळ दंडात्मक कारवाई करून न थांबता, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांनी स्वतः सर्व संबंधित वाहनचालकांना बोलावून त्यांचे कायदेशीर समुपदेशन केले.

अशा प्रकारच्या आवाजामुळे वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांना मोठा त्रास होतो. वाहतुकीचे नियम पाळा आणि शहरात शांतता राखा,” असे आवाहन त्यांनी वाहनचालकांना केले. तसेच, ही कारवाई अशीच नियमित सुरू राहणार असून नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा कडक इशाराही पोलिसांनी दिला आहे.

कारवाईत सहभागी झालेले पोलीस पथक:
यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातूरकर, कुमार ढेरे, पोलीस उपनिरीक्षक: नागेश बनकर, विजय पिसे, पोलीस हवालदार संभाजी यादव, पोलीस कॉन्स्टेबल सुरज साळुंखे आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. या धडक मोहिमेत पोलिसांच्या विशेष पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली

नागरिकांमधून समाधान!
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील मुख्य चौक आणि रस्त्यांवर विनाकारण कर्णकर्कश आवाज करत फिरणाऱ्या टवाळखोरांना चांगलाच लगाम बसला असून, मंगळवेढ्यातील सुजाण नागरिकांमधून या कारवाईचे जोरदार स्वागत होत आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














