mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 21, 2026
in सोलापूर
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या चार बँकांना तात्काळ नोटिसा बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या प्रबंधकांना दिले आहेत.

दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) नाकारलेल्या पीककर्ज अर्जाची सखोल तपासणी करण्याचे आदेशही त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना दिले. संबंधित अर्जाची छाननी करून पुढील पंधरा दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

पीककर्ज वाटपाच्या आढाव्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील विविध बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. काल सायंकाळी साडेपाच वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली.

तब्बल साडेतीन तास सुरू असलेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना पीक कर्ज वाटपाबाबत कठोर शब्दांत जाब विचारला.

राज्य शासनाने दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक राम वाखरडे, जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले यांच्यासह विविध राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांचे अधिकारी उपस्थित होते.

बँक अधिकाऱ्यांचे अजब उत्तर

यावेळी काही बँक अधिकाऱ्यांनी यंदा कर्जमाफी जाहीर होण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकऱ्यांनी जुने पीक कर्ज परतफेड केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे थकीत कर्जामुळे नव्याने पीककर्ज मंजूर करण्यात अडचणी येत असल्याचा खुलासा बँकांकडून करण्यात आला.

यावर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी संबंधित शेतकऱ्यांचे नाकारलेले अर्ज पुढील बैठकीत प्रत्यक्ष सादर करण्याच्या सूचना दिल्या. कर्ज नेमक्या कोणत्या कारणामुळे नाकारण्यात आले, याची स्वतः तपासणी करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चार बँकांना नोटिसा खुलासा मागविला..

पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या आयओबी, करूर वैश्य बँक, बंधन बँक आणि अॅक्सिस बँक यांना तात्काळ नोटिसा बजावून लेखी खुलासा मागविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अग्रणी बँकेला दिल्या आहेत.

तसेच बचत गटांना कर्ज वितरणात टाळाटाळ करणाऱ्या इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक आणि आयओबी बँकेलाही नोटिसा देण्याचे आदेश देण्यात आले. या संदर्भात सविस्तर आढावा बैठक घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही केल्या आहेत.(स्रोत:लोकमत)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन

संबंधित बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 6, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

July 3, 2026
कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

कामाची बातमी! भेसळयुक्त ‘ॲनालॉग’ला नो एन्ट्री; मंगळवेढ्यातील हॉटेल ‘स्वाद’चा ग्राहकांच्या आरोग्यासाठी शुद्धतेचा विडा; अस्सल आणि दर्जेदार चवीची मेजवानी

July 1, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

महिला सक्षमीकरणासाठी ‘वीरश्री’ पतसंस्थेचे मोठे पाऊल; महिला उद्योजकांना केवळ ‘इतके’ टक्के व्याजदराने कर्ज, विविध ठेव योजनांचाही शुभारंभ

July 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

सोलापूर जिल्ह्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ ७ तालुक्यांचे भाग्य बदलणार?

June 30, 2026
मंगळवेढ्यातील श्री सायकल कंपनीमध्ये बॅटरी ऑपरेटर कार वरती 20 टक्के पर्यंत डिस्काउंट; नागरिकांना कार खरेदीसाठी मोठी संधी

मंगळवेढेकरांसाठी खुशखबर! ‘श्री सायकल कंपनी’मध्ये लहान मुलांच्या बॅटरी कार आणि जीपवर धमाकेदार ऑफर; सोबतीला नोकरीची सुवर्णसंधी

June 29, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

हृदयद्रावक! सात महिन्यांचं बाळ पोटातच गेलं, पती-पत्नीचाही जागीच अंत; एकाच चितेवर पेटली नवदांपत्याची चिता; सांगोल्यातील ‘त्या’ अपघाताने डोळ्यात येईल पाणी…

June 29, 2026
Next Post
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! राज्यातील विद्यार्थिनींसाठी मोठा निर्णय; फक्त शिक्षणच नव्हे, तर 'इतर' शुल्कही १०० टक्के माफ; कशाकशात मिळणार ही सूट...

ताज्या बातम्या

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 6, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो नोंद घ्या! ऐन शाळा सुरू होताच शिक्षकांचा ‘एल्गार’; ७ आणि ८ जुलैला शाळा बंद राहण्याची शक्यता; काय आहे कारण?

July 6, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

अखेर प्रतीक्षा संपली! महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी महत्त्वाची पाऊले; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा