टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ , महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने हमीभाव मका खरेदी केंद्राचे उद्घघाटन आज बुधवार दिनांक ९ डिंसेबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे अशी माहिती खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांनी दिली.
सदरच्या कार्यक्रमासाठी जेष्ठ नेते बबनराव आवताडे, उपविभागीय अधिकारी दत्ताञय पाटील, तहसिलदार स्वप्निल रावडे ,सहायक निबंधक प्रमोद दुरगुडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी बी.बी वाडीकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
मका खरेदी प्रति क्विंटल १८५०/- रुपये प्रमाणे होणार असुन हेक्टरी १९ क्विंटल प्रमाणे खरेदी करणेचे आदेश शासनाकडून देणेत आलेले आहेत.
मका विक्रीसाठी आँनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ कार्यालयातुन s.m.s. प्राप्त झालेनंतर मका विक्रीसाठी घेउन यावे अशी सुचना खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शंभु नागणे यांनी केली.
खरेदी केंद्रांच्या अधिक माहिती साठी शंभुमामा नागणे मो नं ९४०५२१४५९५, मच्छिंद्र कोंडुभैरी ९८९०८३१९३४ (९०२८५०९७७७)यांचेशी संपर्क साधावा.
मंगळवेढा तालुक्यातील शेतक-यांना आपला शेतमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणेसाठी ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे याच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी पाठपुरावा करुन हमीभाव खरेदी केंद्र मंजुर करणेत आले.
सदरच्या कार्यक्रमासाठी शेतकरी बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी केले.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज