mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 29, 2024
in मंगळवेढा, राजकारण
येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढणार; अनिल सावंत यांनी फुंकले नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग

मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।

येणाऱ्या सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून मोठ्या ताकदीने लढणार असल्याचे अनिल सावंत यांनी जाहीर केले. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मंगळवेढा येथे आयोजित महाविकास आघाडी विचारमंथन बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते राहुल शहा, माजी नगरसेवक चंद्रशेखर कोंडूभैरी, कार्याध्यक्ष संतोष रंधवे, प्रथमेश पाटील, काँग्रेस नेते फिरोज मुलाणी, बबन ढावरे यांच्यासह ग्रामीण भागातील विविध गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदीजन उपस्थित होते.

अनिल सावंत पुढे बोलताना म्हणाले की, कमी दिवसांमध्ये तो काळ मिळाला त्या काळाचे नियोजन करणे, प्रत्येक गावात जाणे, प्रत्येक नागरिकांना भेटणे याचे नियोजन कमी झाले, आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी निवडणूक लढवली, सर्वांनी मोठ्या ताकदीने मला साथ दिली मी स्वतः या पराभवाची जबाबदारी घेतली आहे.

जो निवडणुकीचा निकाल लागला यावरून शरद पवार साहेब, व उद्धव ठाकरे साहेब यांना संपवण्याचा कुटील डाव सरकारने केला आहे. भाजपच्या उमेदवाराविरोधात महाविकास आघाडीचा एक उमेदवार पाहिजे होता, पण वरिष्ठ पातळीवर याची दखल घेतली गेली नाही.

शरद पवार साहेब प्रत्येक मतदारसंघात बैठक घेणार आहेत, आपल्या मतदारसंघात बैठक होईल. बरेच ठिकाणी आपल्या लोकांनी मतदान केले आहे. तुतारी म्हणून आम्ही मतदान केले आहे तरीपण आपल्याला यश मिळाले नाही.  यापुढेही मोठ्या ताकदीने अनिल सावंत जनतेसाठी काम करणार आहे. चोरी करून निवडणुका जिंकल्या असल्याचा हल्लाबोल अनिल सावंत यांनी केला.

आजपासून कामाला लागून प्रत्येक गावात शाखा सुरू करून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी 24 तास काम करणार आहे.  प्रत्येक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी प्रामाणिक काम करावे येणाऱ्या काळात 2029 ला आपला विजय निश्चिंत असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

लक्ष्मणराव ढोबळे बोलताना म्हणाले की, ही निवडणुक अनिल सावंत यांनी मोठ्या ताकदीने लढली आहे. कमी वेळेत मोठे मताधिक्य घेतले आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या आहेत त्या सर्व चुका सुधारून येणाऱ्या काळात सर्व निवडणुका मोठ्या ताकदीने सर्वांना सोबत घेऊन आम्ही लढून जिंकणार आहोत.

मतदारसंघातील सर्व शासकीय कार्यालयात गोरगरीब जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी आम्ही सर्व नेतेमंडळी जाणार आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक वार्डात जाऊन नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे ढोबळे म्हणाले.

राहुल शहा बोलताना म्हणाले की, या निवडणुकीत अनेक विचार मतदारसंघात मांडले गेले, शरद पवार साहेबांच्या विचारधारे वर आम्ही काम केले आहे. त्यांनी जो आदर्श बांधून दिला त्याप्रमाणे आम्ही प्रामाणिक काम केले आहे.

मंगळवेढा शहरातून काही मोजकेच पदाधिकारी सोबत घेऊन कामाला सुरुवात केली, आमची संघटना विस्कळीत झाली असल्याचे आम्हाला जाणवले.

प्रस्थापितांविरोधात लोकांत प्रचंड चीड निर्माण झाली होती त्यामुळे आम्ही स्वच्छ चेहरा म्हणून अनिल सावंत यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहिलो आहे. शरद पवार साहेबांचा हक्काचा मतदारसंघ असताना काँग्रेसने दगाबाजी करून उमेदवारी जाहीर केली.

आम्ही उमेदवारी एकच राहण्यासाठी खूप प्रयत्न केले पण पवार साहेबांनी आपला हक्काचा मतदारसंघ असताना निवडणूक पूर्ण ताकदीने लढा म्हणून सांगितले होते.

शेतकरी व सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते, त्याच पावलावर अनिल सावंत हे काम करत असून येणाऱ्या काळात आम्ही मोठ्या ताकदीने लढू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमची मते गेली कुठे

100 टक्के EVM मशीनमध्ये घोटाळा असून माझ्या 219 बूथवर आम्हाला कमीतकमी 400 मते आमच्या हक्काची असताना आम्हाला केवळ 14 मते मिळाली आहेत यात मशीन मध्ये घोटाळा असल्याचे रामभाऊ दोलतोडे यांनी सांगितले.

खासदार प्राणिती शिंदे यांनी फसवणूक केली

खासदार प्राणिती शिंदे यांना आमच्या मतदारसंघातून लोकसभेला 45 हजार मताधिक्य आम्ही सर्वांनी मिळवून दिले हे केवळ भालके यांनी मिळवून दिले नाहीत यात सर्वांचे योगदान आहे. शेवटच्या दोन दिवसात विरोधकांनी चुकीचा प्रचार केला, सरकार विरोधात आपण सांगण्यात कमी पडलो असल्याचे मरवडेचे साहेबराव पवार यांनी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अनिल सावंत

संबंधित बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणी वाहून जातंय अन् पिके करपताहेत! भीमा काठच्या शेतकऱ्यांसाठी ८ तास विजेची आमदार समाधान आवताडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

July 27, 2026
मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

मंगळवेढ्यात रंगणार साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव; विविध सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य वाटप, भव्य मिरवणुकीचे आयोजन

July 26, 2026
Next Post
सोलापुरात राष्ट्रवादीला मोठा धक्का ‘या’ बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

राजकीय खळबळ! सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेंच्या निर्णयामुळेच सोलापुरात काँग्रेसचा पराभव; काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 1, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

‘एकतर मी जाईन, नाहीतर सरकार…’; मराठा आरक्षणासाठी जरागेंचा निर्णायक एल्गार, ‘या’ तारखेला जरांगेंचं अखेरचं आंदोलन

August 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा