टीम मंगळवेढा टाईम्स ।
दामाजी कारखान्याच्या प्रशासनाने नियमानुसार सादर केलेली अंतीम मतदार यादी योग्य असताना दौलत माने व रमेश भांजे यांनी
मतदारांची नांवे कमी करणेबाबत जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक, सोलापूर यांचे विरोधात उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल केलेले पिटीशन फेटाळण्यात आले असून मतदारांचे हक्क अबाधित ठेवण्यात आलेले आहे .
शासकीय आफिसचे कामकाज कायद्याच्या चौकटीत राहून चालत असते जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक ,
सोलापूर यांनी कायदेशीर तपासणी करुन नियमानुसार संत दामाजी साखर कारखान्याची मतदार यादी योग्य रितीने प्रसिध्द केलेचे अँड.राजशेखर गोविलकर व अँड.सुहास इनामदार यांनी उच्च न्यायालय , मुंबई यांचे निदर्शनास आणून दिल्याने,
सदर यादी ग्राहय मानून उच्च न्यायालय , मुंबईचे मुख्य न्यायाधिश सांबरे यांनी फिर्यादींनी दाखल केलेले पिटीशन फेटाळले आहे.
यामुळे गेल्या महिनाभरापासून मतदार यादीबाबत कायदेशीर दावे व प्रतिदावे संपुष्ठात आलेले आहेत, अशी माहिती अँड.सुहास इनामदार यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज