mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

माजी आ.गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक; अफवांवर विश्वास ठेवू नये

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 27, 2021
in राज्य, सोलापूर
माजी आ.गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक; अफवांवर विश्वास ठेवू नये

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोला विधानसभा मतदारसंघाचे तब्बल 50 वर्षांहून अधिक नेतृत्व केलेले राज्याच्या राजकारणातील एक आदर्श व्यक्तिमत्व मानले गेलेले माजी आमदार गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

सांगोला या दुष्काळी तालुक्याचे 50 हुन अधिक वर्षे नेतृत्व करून आ.देशमुख यांनी विक्रम केला आहे.त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून समर्थक प्रार्थना करीत आहेत.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोला तालुक्याचे माजी आमदार गणपतरावजी देशमुख यांच्या निधना संदर्भात सांगोला तालुक्यात सोशल मीडिया वरून प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये.

सध्या आबासाहेबांची परिस्थिती चिंताजनक आहे. असे डॉ. अनिकेत देशमुख यांनी पत्रकार सचिन भुसे यांना फोनवरून माहिती दिली आहे.

गणपतराव देशमुख यांची कारकीर्द एक दृष्टिक्षेप :

शेतकरी कामगार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे 11 वेळा प्रतिनिधित्व

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते देवेंद्र फडणवीसांबरोबर केले काम

गणपतराव देशमुख राजकारणात येण्यापूर्वी नामवंत वकील म्हणून सांगोला परिसरात सुपरिचित होते.

1962 साली देशमुखांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली

आणीबाणीच्या काळात गणपतराव देशमुखांना तुरुंगवास भोगावा लागला

1972 च्या निवडणुकीमध्ये गणपतरावांना सांगोल्याचे सध्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. मात्र, दोनच वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा निवडून आले.

1977 साली गणपतरावांनी महाराष्ट्र विधानसभेच ‘विरोधीपक्ष नेते’ पद सांभाळले

1978 च्या शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये मंत्री झाले आणि 1999 ला गणपतरावांची काँग्रेसच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली

2019 च्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आणि नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी निवडणूक लढवली

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.करुणानिधी यांनी 12 वेळा निवडणूक लढली आणि जिंकली गणपतरावांनी 12 वेळा निवडणूक लढवली आणि 11 वेळा जिंकली.

एसटी बस ने प्रवास आणि साधी राहणी यामुळे गणपतराव आजही लोकप्रिय आहेत.

राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गणपतराव देशमुखसांगोला

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 10, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
Next Post
माजी आ.गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक; अफवांवर विश्वास ठेवू नये

भाई गणपतराव देशमुखांच्या प्रकृतीत सुधारणा; शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आज सोलापूरात

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 11, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा