mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भाई गणपतराव देशमुखांच्या प्रकृतीत सुधारणा; शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील आज सोलापूरात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 28, 2021
in सोलापूर, राज्य
माजी आ.गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक; अफवांवर विश्वास ठेवू नये

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सांगोला तालुक्याचे माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ.गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. आबासाहेबांचे नातू डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आज सकाळी ६ वाजता बोलताना ही दिलासादायक माहिती दिली आहे.

मागील ५१ वर्षे सांगोल्याच्या बालेकिल्ल्यात विजयश्रीचा झेंडा रोवणारे आबासाहेब प्रकृती अस्वास्थ्यावर मात करून पुन्हा बरे होतील या अपेक्षा प्रज्वलित झाल्या आहेत.

याबाबत आबासाहेबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी प्रतिनिधीचे बुधवारी सकाळी सहा वाजता संभाषण झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भाई गणपतराव देशमुख यांच्यावर प्रकृतीवर रुग्णालयातील वैद्यकीय पथक सजगपणे लक्ष ठेवून आहे.

मंगळवारी व्हेंटीलेटर काढण्यात आले. रात्रभर बायपॅप मशीनद्वारे त्यांची श्वसनक्रिया सुरु आहे. त्यांच्या हृदयाचे ठोके , श्वसनक्रिया , रक्तातील प्राणवायूचे प्रमाण नॉर्मल बनत चालले आहे.

उपचारांना ते हळूहळू चांगला प्रतिसाद देत आहेत. असे असले तरी त्यांची प्रकृती अद्याप धोक्याबाहेर नाही.

शेकाप सरचिटणीस जयंत पाटील थोड्याच वेळात सोलापूरात शेकापचे सरचिटणीस तथा भाई जयंत पाटील थोड्याच वेळात सोलापूरात दाखल होत आहेत. सोबत माजी आमदार तथा शेकापचे नेते धैर्यशील पाटील हेही येत आहेत.

मंगळवारी रात्री पालकमंत्री दत्तात्रय भरणे , माजी मंत्री मिनाक्षीताई पाटील , राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष माजी आम. दीपकआबा साळुखे – पाटील यांच्यासह राज्यभरातील , जिल्ह्यातील विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी आबासाहेबांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे. (स्रोत:थिंक टँक लाईव्ह)

मंगळवारी आबासाहेबांच्या प्रकृतीबाबत चुकीच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यामुळे चिंतेत अधीकच भर पडत होती.

तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी या काळजीपोटी रात्र जागून काढली आहे. माजी आ.गणपतराव देशमुख यांना मानणारा हजारो कार्यकर्त्यांचा वर्ग सांगोला तालुक्यात गणपतराव तथा आबासाहेबांना मानणा – या तिन पिढ्या सांगोल्यात आहेत.

गावागावांत चिंतेचे वातावरण

आबासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी , ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी तालुक्यातील गावागावांत कार्यकर्ते घोळका करून जमल्याचे चित्र आहे. अनेकजण एकमेकांना फोनकॉल करून विचारपूस करताना दिसत आहेत.

अश्विनी रुग्णालयाबाहेर गर्दी

सोलापूरातील अश्विनी रुग्णालयात आबासाहेबांवर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती नाजूक बनल्याचे समजताच असंख्य कार्यकर्ते सोलापूरात आल्याचे दिसून येत आहे.

रुग्णालय परिसरात गर्दी करण्यास अटकाव करण्यात आला असला तरी शेकडो कार्यकर्ते सोलापूरात तळ ठोकून आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गणपतराव देशमुख

संबंधित बातम्या

धक्कादायक! घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं काय घडलं?

May 14, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर ३ दिवस सोबतच गुवाहाटीमध्ये; हॉटेलच्या डिटेल्स समोर

May 14, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेत मोजणीचा साडेसाती सुटणार! आता ‘इतक्या’ दिवसांत मोजणी अन् ३ दिवसांत फाईल निकाली; महसूलमंत्री बावनकुळेंचे आदेश

May 11, 2026

कामाची बातमी! राज्यातील देवस्थान इनाम जमिनींबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

May 11, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

संतापजनक! शेतीच्या कारणावरून मुलाचा वडिलांवर चाकूने हल्ला; वडिलांची मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार

May 10, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावात पाणी नाही, मजुरांना पैसे नाही! ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभार ठप्प; कोर्टाच्या आदेशामुळे सरपंच अडचणीत; ग्रामीण भागात संतापाचा उद्रेक

May 10, 2026
शेतकऱ्यांना मोठा आधार! सोलापुरात कांद्याला मिळाला प्रति क्विंटल ‘एवढया’ हजारांचा भाव

​कांदा रडवतोय! ५० पैसे किलो भाव; ७३ पिशव्या कांदा विकून खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या पदरात उरली चहा-पाण्याइतकीच रक्कम; बळीराजा’चे डोळे पाणावले

May 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेत ‘या’ विषयात 80 हजारापेक्षा जास्त विद्यार्थी नापास

May 9, 2026
Next Post
धक्कादायक! मंगळवेढ्यातील आश्रमशाळेमधील ४१ मतिमंद मुलांना कोरोनाची लागण

लहान मुलांनाही 'या' महिन्यापासून मिळणार कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

ताज्या बातम्या

धक्कादायक! घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं काय घडलं?

May 14, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

इंधन बचतीसाठी सभापतींचा पुढाकार! दीपाली ताड आता ‘लालपरी’ने करणार प्रवास

May 14, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर ३ दिवस सोबतच गुवाहाटीमध्ये; हॉटेलच्या डिटेल्स समोर

May 14, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

काय चाललंय मंगळवेढ्यात? पंचायत समितीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत

May 12, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! ‘या’ लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा तडकाफडकी निर्णय; एका निर्णयाने सर्वात मोठा धक्का

May 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा