mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अखेर मुहूर्त निघाला! सोलापूर-गोवा विमानसेवेला हिरवा कंदील; ९ जूनपासून टेकऑफ, तिकीट विक्री सुरू; विमानसेवेचे वेळापत्रक जाणून घ्या…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 30, 2025
in मनोरंजन, सोलापूर
पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क ।

तारीख पे तारीख देत अनेक वेळा पुढे ढकलेल्या सोलापूर विमानतळावरील नागरी विमानसेवेला एकदाचा मुहूर्त लागला. विमानसेवा देणाऱ्या फ्लॉय ९१ कंपनीकडून मंगळवारपासून तिकीट विक्री सुरू करण्यात आली.

९ जूनपासून विमानसेवा सुरू होणार आहे. गोवा-सोलापूर या मार्गावर आठड्यातून चार दिवस विमानसेवा दिली जाणार असल्याची माहिती फ्लॉय ९१ चे वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष चिटणीस यांनी दिली.

फ्लॉय ९१ कंपनीच्या संकेतस्थळावर मंगळवारपासून सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर असे सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवसांचे वेळापत्रक व तिकिटांचे दर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

सोलापूर ते गोवा मार्गासाठी प्रारंभिक तिकीट दर दोन हजार ४७५ रुपये आणि ५ टक्के जीएसटी असे आहेत. या दरामध्ये मागणीनुसार वाढ होऊ शकते.

फ्लाय ९१ या कंपनीचा गोवा-सोलापूर हा भारतातील आठव्या क्रमांकाचा मार्ग आहे. एकूण आठ शहरापर्यंत गोव्यातून ही कंपनी विमानसेवा देते. यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, सिंधुदुर्ग आणि आता सोलापूर यांचा समावेश आहे. या विमानसेवेमुळे गोव्याच्या समृद्ध पर्यटनाला सोलापूरचे धार्मिक पर्यटन जोडले जाणार आहे.

सोलापूर येथील विमानसेवेमुळे पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राशी गोवा जोडले जाणार आहे.

गोवा येथील भाविकांना सोलापूरला येण्याची तसेच सोलापूरच्या पर्यटकांना गोव्याला जाण्याची सुविधा या विमानसेवेमुळे निर्माण झाली आहे.

विमानसेवेचे वेळापत्रक

सोमवार व शुक्रवार

गोवा – सोलापूर

प्रस्थान सकाळी ७.२० आगमन सकाळी ८.३०

सोलापूर – गोवा

प्रस्थान सकाळी ८.५० आगमन सकाळी १०.०५

शनिवार व रविवार

गोवा – सोलापूर

प्रस्थान दुपारी ४.०५ आगमन सायंकाळी ५.१०

सोलापूर – गोवा

प्रस्थान सायंकाळी ५.३५ आगमन सायंकाळी ६.५०

सोलापूर केवळ महत्त्वाचे औद्योगिक केंद्र नाही, तर महाराष्ट्राच्या तीर्थक्षेत्र परिघामधील एक प्रमुख धार्मिक केंद्र आहे. आमच्या विमानसेवेमुळे यात्रेकरूंना तसेच व्यावसायिकांना आरामदायी विमानप्रवास करता येईल. आमच्या कंपनीकडून सुरक्षित विमानसेवा पुरविली जाते.- मनोज चाको, व्यवस्थापकीय संचालक, फ्लॉय ९१, गोवा

सोलापूरच्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी दुपारी संकेतस्थळावर विमानसेवेची घोषणा होताच संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांची संख्या बारा पटीने वाढली आहे. पहिल्याच दिवशी सोलापूर मार्गावर तिकीट बुकिंगला प्रारंभ झाला आहे.- आशुतोष चिटणीस, वाणिज्य व्यवस्थापक, फ्लॉय ९१, गोवा

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर गोवा विमान

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 10, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
Next Post
मोठी बातमी! नांदण्यास नकार दिल्याने पतीकडून पत्नीची चाकूने भोसकून हत्या; मंगळवेढा तालुक्यातील घटना; पती, सासू, सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा खून प्रकरणात मोठा ट्विस्ट! आरोपीच्या भावाने वहिनीचा भाव, आईविरोधात केला गुन्हा दाखल; तर पत्नीच्या खूनप्रकरणी पती व सासूला अटक, 3 जूनपर्यंत पोलिस कोठडी

ताज्या बातम्या

मोठी बातमी! राज्यातील प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल, आता ‘या’ वेळेत भरणार चौथीपर्यंतचे वर्ग; सर्व शाळांना नियम लागू

धक्कादायक! निंबोणीतील ‘सहारा बाल आश्रमा’चा बोगस कारभार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल; तक्रारदाराचे गंभीर आरोप

September 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्याच्या महिलेचा सांगोला बसस्थानकावर हातसफाईचा डाव; पोलिसांनी २४ तासांत ठोकल्या बेड्या

September 11, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

​हक्काच्या आरक्षणासाठी मंगळवेढा पेटून उठला; आज शिवतीर्थावर तरुणांचे भव्य ठिय्या आंदोलन; शिक्षण-नोकरीत हक्काचे आरक्षण द्या

September 11, 2026
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा