सोलापूर । प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथे बोगस सामाजिक संस्थेच्या नावाखाली नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मौजे निंबोणी येथील ‘श्री नाथ बहुउद्देशीय सामाजिक संस्था’ संचलित सहारा बाल आश्रम या नावाने चालणाऱ्या बोगस कारभाराविरोधात मंगळवेढ्यातील तक्रारदार सतिश भारत मुदगुल यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून संस्थेची मान्यता तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.

तक्रारीतील गंभीर आरोप:
तक्रारदाराने दिलेल्या अर्जानुसार, या आश्रमात प्रत्यक्ष कोणतेही अनाथ मुले राहत नाहीत. तपासणीसाठी अधिकारी येणार असतील तर तात्पुरती मुले गोळा करून फोटो काढले जातात आणि खोटे ऑडिट रिपोर्ट तयार केले जातात.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती शिंदे व सचिव दादाराव शिंदे हे बाप-लेक मिळून हा गैरप्रकार चालवत असल्याचा आरोप आहे.

आश्रमातील मुलांच्या नावाखाली सुमारे २०० लोकांना कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये फिरवून व्यापारी व सामान्य नागरिकांकडून खोटी माहिती देऊन लाखो रुपयांची देणगी उकळली जात आहे.

सर्टिफिकेटसाठी ५ हजारांची वसुली: देणगी गोळा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून दर सहा महिन्याला संस्थेचे बनावट ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल ५,००० रुपये घेतले जात असल्याचा खळबळजनक दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या बोगस कारभारामुळे खरोखरच अनाथ मुलांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सामाजिक संस्थांवरील जनतेचा विश्वास उडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि संस्थेचे रजिस्ट्रेशन कायमस्वरूपी रद्द करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
या तक्रारीची प्रत धर्मादाय आयुक्त सोलापूर, प्रांत अधिकारी मंगळवेढा, तहसीलदार मंगळवेढा आणि मंगळवेढा पोलीस निरीक्षकांनाही देण्यात आली आहे.
आश्रम व्यवस्थित सुरू
समाजातील अनाथ मुलांसाठी आश्रम सुरू केले आहे, आश्रम सध्या व्यवस्थित सुरू आहे- मारुती शिंदे, संस्थापक अध्यक्ष
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










