टीम मंगळवेढा टाईम्स :
मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मंगळवेढा शहर व तालुक्यातील तरुण आक्रमक झाले आहेत.

आज, शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शिवप्रेमी चौकातील शिवतीर्थावर एकदिवसीय भव्य ठिय्या आंदोलन छेडण्यात येत आहे.

मराठा समाजातील तरुणांच्या शिक्षण आणि नोकरीमधील हक्काच्या आरक्षणाचा प्रश्न शासनाने तातडीने मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन उभारले जात आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष प्रलंबित मागण्यांकडे वेधले जाणार असून, संपूर्ण आंदोलन शांततेच्या व लोकशाही मार्गाने पार पडणार आहे.

या ठिय्या आंदोलनात शहर व तालुक्यातील सर्व समाजबांधव, तरुण, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा द्यावा, असे जाहीर आवाहन ‘सकल मराठा समाज मंगळवेढा शहर व तालुका’ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:
स्थान: शिवप्रेमी चौक, शिवतीर्थ, मंगळवेढा
वेळ: सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत
स्वरूप: एकदिवसीय शांततामय ठिय्या आंदोलन
प्रमुख मागणी: मराठा आरक्षण प्रश्न त्वरित मार्गी लावणे व मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











