टीम मंगळवेढा टाईम्स । प्रतिनिधी
रतनचंद शहा सहकारी बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे चेअरमन राहुल शहा यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळ, सभासदांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली.

या सभेमध्ये चेअरमन राहुल शहा यांनी बँकेच्या अडचणी प्रगती व भविष्य याबद्दल वस्तुस्थिती स्पष्ट केली. बँकेबद्दल अपप्रचार केला जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

बँक रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे कामकाज करत आहे. सध्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक अडचणीला बँकेला संचालक मंडळाला सभासदांना देखील तोंड द्यावे लागत आहे. परंतु केवळ सभासदांच्या विश्वासावर ही बँक सध्या टिकून आहे.

बँकेचे १६,४०४ सभासद असून सुमारे १८६ कोटी रुपये भाग भांडवल आहे. १९८ कोटी रुपयाच्या ठेवी आहेत. बँक सध्या संक्रमणाच्या अवस्थेत आहे, वेगवेगळ्या अडचणी असल्यामुळे वसुलीवर परिणाम झाला असल्यामुळे बँकेला सभासदांना लाभांश देता आला नाही.

मात्र, २०२८ या वर्षापासून सभासदांना लाभांश दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे वसुली सुरू आहे. वसुली अपेक्षित नसल्यामुळे अडचण येत आहे.
यामुळे नेट बँकिंग, एटीएम, ऑनलाईन सुविधा देण्यास बँकेला सध्या अडचण आहे. परंतु, भविष्यात या सर्व सुविधा बँकेमार्फत सभासद ग्राहकांना दिल्या जाणार आहेत.

लक्ष्मीनारायण सभागृहात झालेल्या या सर्वसाधारण बैठकीत सुरुवातीला संस्थापक चेअरमन स्व. रतनचंद शहा, माजी चेअरमन स्व. सुभाष शहा यांच्या प्रतिमेचे पूजन संचालक मंडळाने केले.
त्यानंतर चेअरमन राहुल शहा यांनी अहवाल वाचन केले. बँकेचे अधिकारी दयासागर देशमाने यांनी विषय पत्रिकेवरील विषयाचे वाचन केले, सर्व विषय उपस्थित सभासदांनी मंजूर केले. संचालक राजकुमार जाधव यांनी शेवटी आभार व्यक्त केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











