टीम मंगळवेढा टाईम्स ।
घरासमोर येऊन मुलगी आरती ही नांदण्यास जात नसल्याने व तिने सोडचिठ्ठी व पोटगीबाबत मंगळवेढा कोर्टात दाखल दाव्याचा राग मनात धरून सासू विमल पाटील हिने आम्हास शिवीगाळ करून मुलगी आरतीस धरून ठेवले
व जावई अमोल पाटील याने हातातील धारधार चाकूने आरतीचा मंगळवारी खून केल्याप्रकरणी विवाहितेची आई सोनाली चौगुले यांनी फिर्याद दिल्यानंतर मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात होता.
पती अमोल पाटील, सासू विमल पाटील (रा. ढेकळेवाडी) आरोपींना अटक करून बुधवारी दुपारी मंगळवेढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सासरे हे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना अटक केली नाही. याबाबत माहिती अशी, मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरासमोर वाद होऊन खून करण्यात आला.
पोलिसांनी पती अमोल पाटील, सासू विमल यांना अटक करून बुधवारी दुपारी मंगळवेढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर सासरे हे गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नाही.
दीराकडून वहिनीचा भाव, आईविरोधात गुन्हा केला दाखल
याच गुन्ह्यात परस्पर विरोधी फिर्याद बुधवारी रात्री दाखल करण्यात आली आहे, यामध्ये मृत आरतीच्या दिराने फिर्याद दिली असून, त्यांचे आई-वडील, भाऊ अमोल, चुलते राजाराम पाटील आणि दादा मेटकरी असे वहिणी आरती हिला नांदण्यास येणेकरीता समजावून सांगण्यास गेले होते. त्यावेळी भांडण झाले.
वहिणीचा भाऊ प्रसाद आणि तिची आई सोनाली यांनी फिर्यादीच्या वडिलांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तेथे असलेल्या विटा हातात घेऊन विटांनी डोकीत चेहऱ्यावर मारून त्यांना गंभीर जखमी केले आहे.
म्हणून प्रसाद चौगुले व सोनाली चौगुले (रा. शनिवार पेठ, मंगळवेढा) यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद अनिल पाटील यांनी दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज