mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

न्यायालयीन लढा, सारथीच्या योजना अन् कुणबी दाखले; ‘मराठा आरक्षण कक्ष’ सांभाळणार ही ५ महत्त्वाची कामे; सरकारचे मोठे पाऊल; मंत्रालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 26, 2026
in राज्य
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।

मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे प्रभावी सनियंत्रण, मराठा आरक्षणासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणांचे समन्वय मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामकाजाचे व्यवस्थापन आणि

अनुषंगिक कामकाजासाठी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागामध्ये स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्यासाठी पाच अधिकारी आणि कर्मचारी मंजूर करण्यात आले आहे.

मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाने विविध योजना घोषित केल्या आहेत. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने २२ ऑगस्ट २०२५ मध्ये मंत्रीमंडळाच्या उपसमितीचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पुनर्गठन करण्यात आले.

त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात आज परिपत्रक काढण्यात आले असून त्यामध्ये अवर सचिव दर्जाचा अधिकारी, कक्ष अधिकारी, विधी अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर असे पाच अधिकारी, कर्मचारी नियुक्त होणार आहेत.

मराठा आरक्षण कक्षाद्वारे कॅबिनेट उपसमितीच्या बैठकांचे आयोजन करणे, आंदोलकांच्या मागण्यांवर कार्यवाही, न्यायालयीन प्रकरणे हाताळणे आणि ‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळा’च्या योजनांचे विश्लेषण करणे यांसारखे प्रशासकीय कामकाज पार पाडले जाईल. हा कक्ष इतर विभागांशी समन्वय साधून सर्व योजनांची काटेकोर अंमलबजावणी करेल.

आरक्षणाशी संबंधित धोरणात्मक निर्णयांसाठी स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका आयोजित करणे आणि बैठकीपूर्वी लागणारी अद्ययावत माहिती पुरवणे. मराठा आंदोलकांनी दिलेल्या निवेदने व मागण्यांवर तातडीने प्रशासकीय कार्यवाही करणे, आरक्षणाबाबतच्या सर्व न्यायालयीन खटल्यांची तयारी व समन्वय साधणे.

सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या योजनांचे संकलन व विश्लेषण करणे, विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, वसतिगृह, परदेशी शिष्यवृत्ती, विवाह भत्ता आणि इतर लाभांची माहिती एकत्र करणे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग अधिनियमांतर्गत नियुक्त उमेदवारांची माहिती गोळा करणे.

तसेच, अधिसंख्य पदांवरील उमेदवारांच्या मागण्यांवर प्रशासकीय कार्यवाही करणे. कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भातील आवश्यक कागदपत्रांच्या शोधासाठी काम करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या कामकाजाशी समन्वय राखणे. आदी कामे या कशाद्वारे केली जातील.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मराठा आरक्षण

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 13, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 13, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

मोठी बातमी! महाराष्ट्रात दूध, दही आणि पनीर होणार महाग; ‘या’ दिवशी पासून नवीन भाव लागू

August 9, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 10, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

मुलीचा संसार वाचवण्यासाठी सासू सरसावली; जावयाला किडनी दान करून दिले नवजीवन

August 4, 2026

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा! जबरदस्तीने धर्मांतरासाठी आता सात वर्षे कारावास; धर्मांतरविरोधी कायदा राज्यात लागू

August 4, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; 'या' एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

ताज्या बातम्या

प्रामाणिकपणाचा आदर्श! ​रात्री दामाजी चौकात पडला महागडा मोबाईल… पुढे अक्षयने जे केले त्याने जिंकली मंगळवेढेकरांची मने

प्रामाणिकपणाचा आदर्श! ​रात्री दामाजी चौकात पडला महागडा मोबाईल… पुढे अक्षयने जे केले त्याने जिंकली मंगळवेढेकरांची मने

August 13, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जुन्या वादातून तुफान हाणामारी; दोन्ही गटांचे एकमेकांवर गंभीर आरोप, मंगळवेढा पोलीस ठाण्यात १६ जणांवर गुन्हे दाखल

August 13, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न सुटणार! ५ टीएमसी पाण्यासाठी सर्व्हेचे आदेश; आमदार समाधान आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

August 12, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मंगळवेढ्यात थरार! काळ्या स्कॉर्पिओतून आले अन् चाकू-रॉडने हल्ला केला; कार बंद पडल्याचा फायदा घेत कुटुंबाला धाक दाखवून १ लाख ४ हजारांचा मुद्देमाल लांबवला

August 12, 2026
लाडकी बहीणनंतर लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा खात्यात येणार ‘इतकी’ रक्कम; पंढरपूरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

भेसळखोरांचे धाबे दणाणले! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखठोक आदेश, ‘हयगय करू नका, थेट मकोका लावा’

August 13, 2026
सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा