टीम मंगळवेढा टाईम्स ।
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आज रविवार रोजी सोलापूर शहरासह सांगोला दौऱ्यावर येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली.
रविवारी सकाळी ११ वाजता सोमय्या हे एम्प्लॉयमेंट चौक येथील शांतीसागर मंगल कार्यालय येथे भाजपाच्या नेते- कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
दुपारी एक वाजता याच ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे. त्यानंतर ते सांगोलाकडे रवाना होणार आहेत.
सांगोला येथे ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. सांगोला येथून ते पुन्हा सोलापूर येथे परतणार असून रेल्वेने मुंबईकडे रवाना होणार आहेत.
कोळा येथे घराशेजारूनच रोटरची चोरी
चोरट्यांनी शेतकरी घरात : झोपल्याची संधी साधून शेती कामाचा सुमारे ५० हजार रुपये किमतीचा रोटर चोरून नेला. शेतकऱ्याने त्याचा शोध घेऊनही तो न सापडल्याने तब्बल अडीच महिन्याने १५ ऑक्टोबर रोजी सांगोला पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली.
कोळा (ता . सांगोला) येथील हरी बापू कुदळे यांनी २०२० मध्ये अरळी ( दक्षिण सोलापूर ) येथील फिरोज मुसकुरे यांच्याकडून रोटर विकत घेतला.
हा रोटर ते शेतीतील कामे झाल्यानंतर घराच्या बाजूलाच उभा करीत होते . दरम्यान , ३१ जुलैरोजी हरी कुदळे जेवण करून रात्री १० वाजता घरात झोपले . मध्यरात्री चोरट्यांनी त्यांचा सुमारे ५० हजार रुपये किमतीचा रोटर चोरून नेला.
१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे झोपेतून उठून घराबाहेर आले असता , त्यांना घराशेजारी रोटर दिसून आला नाही . त्यांनी त्याचा आजूबाजूला तसेच गावात शोध घेतला असता , तो मिळून आला नाही. यानंतर शोधाशोध करूनही न अडीच सापडल्याने तब्बल महिन्यांनी १५ ऑक्टोबर रोजी पोलिसात फिर्याद दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज