mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 30, 2022
in राज्य
मोठी बातमी! भाजपचे धक्कातंत्र; आज एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भाजपच्या पाठींब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनणार असल्याची घोषणा आज फडणवीस यांनी केली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी पहिल्यांदा फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली.

यानंतर या दोन्ही मान्यवरांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली.

याप्रसंगी नव्या सरकारसाठी आवश्यक असणार्‍या संख्याबळाचा पुरावा म्हणून त्यांना आमदारांच्या पाठींब्यांचे पत्र प्रदान करण्यात आले.

राज्यपालांनी भावी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. यानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.

याप्रसंगी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते.

अपक्षांसह आम्हाला १७० आमदारांचे पाठबळ होते. यामुळे साहजीकच युतीचे सरकार होईल अशी अपेक्षा होती. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी भाजपचे मुख्यमंत्री बनतील अशी घोषणा केली होती.

मात्र निकालानंतर, शिवसेनेच्या नेत्यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यांनी हिंदुत्वाचा विरोध करणार्‍या कॉंग्रेस व राष्ट्रवादीला सोबत घेतले हे जनमताचा अपमान होता. यानंतर नेहमीच हिंदुत्वाचा अपमान करण्यात आला.

दाऊदशी संबंधीत असलेला मंत्री जेलमध्ये जाऊन देखील त्याला काढण्यात आले नाही. जाता-जाता नामांतर केले असून त्याला आमचे समर्थनच असल्याचे फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांची मोठी कुचंबणा होती. ज्यांच्याशी लढलो आणि पुढे देखील ज्यांच्याशी लढायचे आहे त्यांची सोबत कशासाठी अशी त्यांची भावना होती.

मात्र उध्दवजींनी आमदारांचे न ऐकता कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची सोबत ठेवली. के सरकार कधीही पडणार असल्याचे मी सातत्याने सांगत होतो. लोकांवर निवडणुका लादणार नसल्याचेही आम्ही सांगत होतो.

यामुळे भाजप, शिंदे यांचा शिवसेना विधीमंडख गट आणि १६ अपक्ष यांचे पत्र आम्ही राज्यपालांना दिले आहे. याप्रसंगी त्यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

धक्कादायक! विजेचा धक्का लागून अख्ख कुटुंब संपलं, चौघांचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

July 8, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो नोंद घ्या! ऐन शाळा सुरू होताच शिक्षकांचा ‘एल्गार’; ७ आणि ८ जुलैला शाळा बंद राहण्याची शक्यता; काय आहे कारण?

July 6, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांनो! ट्रॅक्टर-बैलगाडी आता कोणीच अडवणार नाही; शेतीकामांसाठी मुरूम, दगड मोफत

July 7, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सिंघम रिटर्न! FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा दणका; बाजारपेठेतून सुटे तेल गायब, बनावट दूध, पनीर विक्रेते रडारवर; डेअरी व्यावसायिकही अस्वस्थ; भेसळखोरांचे धाबे दणाणले

July 2, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकऱ्यांच्या जीवनात नवा प्रकाश! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ऐतिहासिक मोठी घोषणा; शेतकऱ्यांचा ‘हा’ मोठा त्रास आता कायमचा संपणार?

July 2, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

शेतजमीन नसली, तरीही राबणारी महिला ‘शेतकरी’च; महिला सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर; कोणाला मिळेल दर्जा? कुठे करावा अर्ज?

July 2, 2026
सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यास अख्ख्या गावाला मोफत रक्तपुरवठा

हे यमराजा, उद्या आमच्या बायका येतील पण…;  वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला नक्की काय घडलं? पुरुषांनी फोडला हंबरडा; ज्याची चर्चा आता संपूर्ण राज्यात आहे?

June 29, 2026
Next Post
आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

आषाढी एकादशीला शेवटी पांडुरंगाने पंढरपुरात एकनाथालाच बोलावले; आ.समाधान आवताडे यांना विठ्ठल पावणार मंत्रिमंडळात वर्णी लागणार

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

धक्कादायक! विजेचा धक्का लागून अख्ख कुटुंब संपलं, चौघांचा मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

July 8, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरात पोलिसांचे ‘मॉकड्रिल’

July 8, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हट्टापायी पोटचा मुलगा गेला…; सांगोल्यातील ‘या’ घटनेने पालकांचे डोळे उघडले, नक्की वाचा काय घडलं?

July 8, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

गुन्हेगारांनो सावधान! सुधारा, नाहीतर थेट कारवाई..; पोलिसांची सिंघम स्टाईल ॲक्शन; पोलीस अधीक्षकांनी गुंडांना बोलावून भर चौकात दिला सज्जड दम; लिहून घेतले हमीपत्र

July 7, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली! हवामान खात्याच्या ‘या’ अंदाजाने उजनी धरणाच्या पाणीपातळीत होणार मोठा चमत्कार?

July 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा